मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच पार्थिव मुंबईतील वडाळा येथील भक्ती पार्क या त्यांच्या निवासस्थानी अत्यंदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्यावर उद्या बीड येथे संध्याकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
[read_also content=”विनायक मेटे यांचं अकाली निधन मनाला वेदना देणारं, उद्धव ठाकरेंकडून शोक व्यक्त https://www.navarashtra.com/latest-news/kokan/uddhav-thackeray-condoles-the-untimely-demise-of-vinayak-mete-nrps-315880.html”]
शिवसंग्राम कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज (14 ऑगस्ट) संध्याकाळपर्यंत विनायक मेटे यांचे पार्थिव एअर अॅम्ब्युलंस द्वारा बीड मध्ये त्यांच्या घरी नेण्यात येईल. उद्या 15 ऑगस्ट दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत मेटे यांचे पार्थिव शिवसंग्राम भवन मध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. दुपारी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात (Navi Mumbai MGM Hospital) दाखल करण्यात आलं होतं. मेटे यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्ड आणि गाडी चालकाची प्रकृती गंभीर होती. दरम्यान उपचारादरम्यान मेटे यांचं निधन झालं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली. मराठा आरक्षणासंदर्भात आज महत्वाची बैठक होती, त्या बैठकीसाठी ते मुंबईला निघाले होते. त्यांनी आज बीडमध्ये बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं. मात्र मराठा आरक्षणासंदर्भात बैठकीसाठी फोन आल्यानं ते काल बीडहून मुंबईकडे निघाले होते.
[read_also content=”विनायक मेटे यांच्या निधनाने एक संघर्षशील नेता हरपला : नाना पटोले https://www.navarashtra.com/maharashtra/with-the-death-of-vinayak-mete-a-struggling-leader-has-been-lost-nana-patole-nrdm-315960.html”]