लाडकी बहीण योजना (फोटो आदिती तटकरे ट्विटर अकाऊंट )
यंदाच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. दरम्यान या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्यास महिलांच्या खात्यात १,५०० रूपये जमा होणार आहेत. दरम्यान महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. आतापर्यंत जवळपास सव्वा कोटींच्या आसपास महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. मात्र अनेक महिलांना पैसे अजून मिळाले नाहीत. वेगवगेळ्या चार्जेस अंतर्गत बँक महिलांच्या खात्यातून पैसे कापून घेत आहेत. मात्र महिलांना येणाऱ्या या अडचणींची दखल राज्य सरकारने घेतली आहे.
माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात या योजेनचे पैसे जमा होत आहेत. एक कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा करण्यात आले आहेत. आधार कार्ड लिंक असणाऱ्या खात्यात हे पैसे जमा केले जात आहेत. मात्र अनेक लाभार्थी महिलांचे पैसे बँकेने कापून घेतले आहेत. मिनिमम बॅलन्स न ठेवल्याने लागणारे चार्जेस बँकेने लावल्याने तसेच चार्जेस लावल्याने महिलांच्या १५०० ते ३००० रुप्यांमधील रक्कम कापून घेतली आहे. यामुळे महिलांनी बँका आम्हाला पैसे देण्यास नकार देत असल्याची तक्रार केली आहे. तर काही जणांना योजनेचे पैसे मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे राज्य दखल घेतली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे बँकांनी कपात करू नये – महिला व बालविकास विभागाकडून बँकांना सूचना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करू नये अशा सूचना सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत.
लाभार्थ्याचे कर्ज थकीत असले तरीही… pic.twitter.com/ASPT5X9V2F— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) August 22, 2024
राज्य सरकारने महिलांच्या या अडचणींवर बँकांना सूचना दिल्या आहेत. महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत एक्स वर पोस्ट शेअर केली आहे. माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करू नये अशा सूचना राज्य सरकारने सर्व बँकांना दिल्या आहेत. जर का कोणत्याही कारणासाठी लाभार्थ्यांचे खाते गोठवण्यात आले असल्यास, ते पूर्ववत करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. त्यामुळे या योजनेचे संपूर्ण पैसे महिलांना मिळणार आहे.