पुणे : काेराेनाची परिस्थिती निवळल्याने महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना तयार केलेल्या ‘काॅमन मिनीमम प्राेग्राम’मधील उर्वरीत कामांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पुण्यात काँग्रेस भवन येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पटाेले आले हाेते. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधताना ही माहिती दिली. ‘‘राज्यात पहाटेच सरकार जेव्हा पडलं तेव्हा राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना एकत्र सरकारबाबत प्रस्ताव पाठविला गेला हाेता. त्यावेळी सोनिया गांधी यांनी कॉमन मिनिमम प्रोग्रॅम दिला हाेता.
राज्यात महाविकास आघाडीची सरकार आली. पण २ वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने नागरिकांच्या आरोग्यासाठी काम केलं आणि इतर राज्यांच्या तुलनेत राज्यात दुःखद घटना कमी झाल्या. या काळात सरकार स्थापन करताना जो कॉमन मिनिमम प्रोग्रॅममधील काही मुद्दे राहिले आहे. ते सगळे मुद्दे आत्ता सरकारच्या वतीने राबविण्यात याव्या यासाठी काँग्रेस पक्ष्याच्या वतीने मुख्यमंत्र्यांना मागणी करण्यात आली आहे, असे पटाेले यांनी सांगितले.
यूपीएचं नेतृत्व काँग्रेसच करेल
यूपीएच्या अध्यक्षपदी शरद पवार यांना करावं असा ठराव राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केलं आहे. यावर पटोले यांना विचारलं असता ते म्हणाले की, त्यांच्या पक्षात काय ठराव करावं हे त्यांच्या पक्षाचा विषय आहे. पण देशात भाजपला पर्याय हा काँग्रेसच आहे आणि युपीएचं नेतृत्व काँग्रेसच करेल. ज्याला जे ठराव करायचे आहे ते त्याने करावं, असं यावेळी पटोले म्हणाले.