खालापूर : मंगळवारपासून चिपळूण, रायगड, रत्नागिरी, कोल्हापर, मुंबईसह पश्चिम उपनगर तसेच ठाणे, डोबिंवली, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर येथे मुसळधार पाऊस (Rain) पडत आहे. तसेच पश्चिम उपनगरात अंधेरी, बोरिवली, वसई, विरार आणि नालासोपारा येथे मुसळधार पाऊस होत आहे. पावसामुळं अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळं याचा परिणाम वाहतुकीवर झाला. (Mumbai Rain) दरम्यान, रायगड, चिपळूण तसेच कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळं रायगडच्या खालापूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. रायगड (Raigad) जिल्ह्यातील खालापूरजवळील इरशाळवाडीवर (Irshalgad) (इरसालगड) इथं दरड (Landslide) कोसळल्याची घटना घडली. यामध्ये 100 हून अधिक लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या येथे बचावकार्य व शोधकार्य जरी सुरु असले तरी, यात अनेक अडचणी येताहेत.
बचावकार्यात अडचणींचा सामना…
दरम्यान, दुसरीकडे ही घटना बुधवारी रात्री १०.३० वाजत घडली. यानंतर मध्यरात्री एनडीआरएफ, पोलीस, स्थानिक प्रशासन, श्वास पथक आदी घटनास्थळी पोहचले आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांसह आत्तापर्यंत चार मंत्री पोहचलेत. उदय सामंत, अनिल पाटील, गिरीश महाजन, अदिती तटकरेही तसेच विरोधीपक्षनेते अंबादास दानवे देखील पोहचली आहेत. तर सध्या बचावकार्य सुरु आहेत, मात्र पायथ्यापासून गडावर पोहचण्यास पायी एक ते दिड तास लागत आहे. अजूनही येथे धोका आहे. वर जाण्यासाठी प्रचंड पाऊस पडत आहे. तसेच धुके व अंधार असल्यामुळं बचावकार्यात अनेक अडथळे येताहेत.
इयरलिफ्ट करणार?
ईर्शाळगडाजवळ हेलिकॉप्टर तसेच जेसीबीही नेण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळं गडावर जाण्यसाठी पायी रस्ता आहे, तो मोठ्या प्रमाणात निसरट आहे. त्यामुळं अग्निशमन दलाला देखील तिथे पोहचण्यास अडथळे येताहेत. अजूनही प्रचंड पाऊस पडत आहे. सकाळी पाच वाजता बचावकार्य सुरु असताना, गडावर पोहचत असताना, दम लागल्यानं अग्निशमन दलातील एका जवानाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं येथे इयरलिफ्ट करण्याचा विचार होऊ शकतो का, यावर चर्चा सुरु असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
पाच लाखांची मदत…
रायगडमधील खालापूर येथील इर्शाळगडाच्या (irshalwadi accident) पायथ्याशी असलेल्या इरशाळवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळली. (Land Slading) या दरडीच्या मलब्याखाली 40 घरे दबली गेली आहेत. आतापर्यंत घटनास्थळावरून 4 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमींचा सर्व खर्च राज्य सरकार करणार असल्याचेही सांगितले.