नागपूर : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल (Climate Change) जाणवत आहे. यापूर्वी अवकाळीने हैराण केले होते. त्यानंतर आता राज्यात उष्णतेची लाट (Sun Stroke) येताना दिसत आहे. मोचा चक्रीवादळाचा (Mocha Cyclone) मोठा परिणाम देशासह महाराष्ट्रात दिसून येत आहे. त्यानंतर राज्यात 17 मे पासून पुन्हा एकदा उष्णता वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
राज्यात अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यात आता मोचा चक्रीवादळामुळे वातावरणात प्रचंड बदल जाणवत आहे. गेल्या काही दिवसांत अवकाळी पावसाने विश्रांती घेतली असली तरी उष्णता वाढत आहे. 17 मे पासून राज्यात पुन्हा एकदा उष्णता वाढणार असून, हवामान विभागाकडून याबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आरोग्याची घ्या काळजी…
भारतीय हवामान विभागाने राज्यभरात उष्णतेच्या लाटेबाबत अलर्ट जारी केला. आयएमडीच्या प्रादेशिक हवामान विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 17 मे पासून महाराष्ट्रातील अनेक भागात तापमान 2-3 अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी उष्णतेपासून आवश्यक ती काळजी घ्यावी. दुपारच्या वेळी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, बाहेर जाताना छत्री स्कार्फचा वापर करावा, असेही यामध्ये सांगण्यात आले.