गोसेच्या कालव्यात तरुणाचा मृत्यू (File Photo : Drowned)
उत्तूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : आजऱ्याजवळील परोली बंधाऱ्यात बुडून दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (दि.29) दुपारी चारच्या सुमारास घडली. मृतांमध्ये रोझारीओ अंतोन कुतिन्हो हे वकील, फिलिप अंतोन कुतिन्हो हे आयटी इंजिनिअर तर लॉईड पास्कोन कुतिन्हो हे मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीस होते.
हेदेखील वाचा : Satish Wagh Case: गुप्तांग कापलं, 72 वेळा चाकून भोसकलं; सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर
नाताळच्या सणासाठी सर्वजण एकत्र जमले होते. रविवारी दुपारी साडेतीन-चारच्या सुमारास ते पोहण्यास गेले होते. धरणातून पाणी सोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा वेग वाढला होता. बंधाऱ्यातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे प्रथम रोझारीओ व फिलीप पाण्यात बुडाले. त्यांना वाचविण्यासाठी लाॅईड गेला असताना तोही बुडाला. बंधाऱ्याच्या काठावर असलेल्या मुलांनी आरडाओरड करताच नागरिकांनी बंधाऱ्याकडे धाव घेतली.
दरम्यान, बंधाऱ्याच्या काठावर थांबलेल्या मुलांनी घरामध्ये फोन करून घडलेली घटना सांगितली. त्यामुळे परोली बंधाऱ्यावर एकच गर्दी जमली होती. सायंकाळी उशिरा शंतनू पाटील, आश्रम सांबरेकर, निखिल पाचवडेकर, सिद्धेश नाईक, गौरव देशपांडे, असीफ आगा, हसन उर्फ साफा मकानदार यांनी तिघांचेही मृतदेह बंधाराच्या पाण्यातून बाहेर काढले. यावेळी मोठी गर्दी जमली होती. कुतिन्हो कुटुंबियांनी केलेला आक्रोश एकच पिळवटून टाकणारा होता.
रायगडमध्ये चौघांचा बुडून मृत्यू
रायगड माणगाव येथेही नुकतीच दुर्दैवी घटना घडली होती. रायगडच्या रवाळजे गावात दु:खद घटना घडली होती. गावातील कुंडलिका नदीच्या पात्रामध्ये बुडून चार जणांचा मृत्यू झाला आहे. नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्यांचा नदीवर गेले असताना तेथे त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. या बुडालेल्यांमध्ये तीन महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. बचाव पथकाला दोघांचे मृतदेह सापडले असून, अद्याप दोन मृतदेहांचा शोध घेतला जात आहे.
हेदेखील वाचा : Santosh Deshmukh Case: ‘सीआयडी’च्या हाती महत्त्वाचे धागेदोरे; वाल्मिक कराडची 100 हून अधिक…