 
        
            यवतमाळ : नागपूर पांढरकवडा मार्गे हैदराबादकडे कत्तलीसाठी जात असलेल्या म्हशीची अवैध वाहतूक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी जेरबंद केले. यामध्ये चार लाख ४९ हजार रुपयाची जनावरे व ट्रक १९ लाख असा एकूण २३ हजार ४९ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई ७ एप्रिलला पहाटेच्या सुमारास पांढरकवडा पोलिसांनी केळापूर टोल नाका परिसरात केली. तालीब निज्जर मेहु, (वय २२) रा. राजपूर, ता. पुन्हाना, जि. नुहु राज्य हरियाणा व त्याचे साथीदार आसिफ एहसान कुरेशी (वय ३०) व कासिम अब्दुल गफार, (वय २२) दोन्ही (रा. पुराना कसबा, केतीपुरा मोहल्ला, बागपत, जि. बागपत, उत्तर प्रदेश ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.






