आलिशान होंडा सिटी कारमधून उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये रेकी केली. भर दिवसा बंद घरांचे लॉक तोडून चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (LCB) यश आले आहे. या टोळीचा मुख्य सूत्रधार असलेल्या अट्टल गुन्हेगारासह तिघांना उत्तर प्रदेशातील सिकंदराबाद येथून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ₹१५ लाख ५० हजार किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून, रायगड, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण १० घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.