पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांच्यावर सोशल मीडियावर पोस्ट केल्याच्या रागातून गुंड पाठवून मारहाण केल्याचा गंभीर आरोप एका महिलेने केला होता. या आरोपांमुळे पुण्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती, मात्र आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.मारहाण झालेल्या माधवी खंडाळकर नावाच्या महिलेने एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. या व्हिडिओमध्ये त्या रक्तबंबाळ अवस्थेत दिसत होत्या. “केवळ मी काल एक पोस्ट केली होती, माझं वैयक्तिक मत लोकशाही म्हणून मांडलं होतं. रूपाली पाटील, त्यांची बहीण प्रिया पाटील आणि इतरांनी मिळून माझ्या घरात घुसून मला मारहाण केली. लवकरात लवकर हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करा, हे सर्व रूपाली पाटील यांनी केलेलं आहे.” असे म्हणत त्यांनी फेसबुक वर लाईव्ह केला होता. त्यानंतर रूपाली पाटील यांच्याशी ज्यावेळेस आम्ही संपर्क केला त्यावेळेस त्यांनी हे सगळे आरोप खोटे असल्याचे सांगत मी बीड वरून पुण्याला येत आहे असे सांगितले. त्यानंतर फेसबुक वर लाईव्ह केला. माधवी खंडाळकर यांनी यू-टर्न घेतल्यानंतर रूपाली ठोंबरे पाटील यांनी आपल्यावरील आरोप हे राजकीय षडयंत्र असल्याचा दावा केला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या एका नेत्या रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रूपाली ठोंबरे पाटील यांनी दावा केला की, रूपाली चाकणकर यांनीच माधवी खंडाळकर यांना राजकीय डावातून त्यांच्याविरोधात व्हिडिओ बनवण्यास भाग पाडले. यामुळे राष्ट्रवादीतील दोन्ही ‘रूपाली’ नेत्यांमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
.