ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान हार्दिक पांड्याबद्दल मोठी बातमी! (Photo Credit - X)
Hardik Pandya News: भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याबद्दल (Hardik Pandya) मोठी बातमी येत आहे. हार्दिक पांड्या लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. आशिया कप २०२५ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सुपर फोर सामन्यादरम्यान हार्दिकला क्वाड्रिसेप्सची दुखापत झाली होती. दुखापतीमुळे हार्दिक पांड्या पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात खेळला नव्हता. तेव्हापासून हार्दिक पांड्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याला एकदिवसीय आणि टी-२० संघातही स्थान देण्यात आले नव्हते. आता, हार्दिकच्या पुनरागमनाबद्दल एक मोठी अपडेट येत आहे. हार्दिक पांड्या वेगाने बरा होत आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या व्हाईट-बॉल मालिकेत खेळताना दिसू शकतो.
Hardik Pandya working hard ahead of the series against South Africa. 🇮🇳 pic.twitter.com/gyiC6oNpUi — Johns. (@CricCrazyJohns) October 31, 2025
मिळालेल्या वृत्तानुसार, हार्दिक सध्या बंगळुरू येथील भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) येथे आहे आणि यूएईमध्ये झालेल्या टी-२० आशिया कप दरम्यान झालेल्या क्वाड्रिसेप्सच्या दुखापतीतून तो वेगाने बरा होत आहे. त्याची तंदुरुस्ती हळूहळू सुधारत आहे, त्यामुळे चाहते लवकरच त्याला टीम इंडियाच्या जर्सीमध्ये मैदानावर परतताना पाहतील.
वृत्तपत्रानुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “सुट्टीनंतर, हार्दिक २१ ऑक्टोबर रोजी बंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पोहोचला. तो एक महिना सीओईमध्ये राहणार आहे. त्याने त्याचे जिम सत्र पुन्हा सुरू केले आहे आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या व्हाईट-बॉल मालिकेदरम्यान कधीतरी पुन्हा खेळेल.”
आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यापूर्वी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. त्याने २ धावा केल्या आणि एक विकेट घेतली, परंतु दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावे लागले आणि तो सामना पूर्ण करू शकला नाही. सामना सुपर ओव्हरमध्ये गेला आणि भारत जिंकला. दुखापतीमुळे हार्दिक पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात खेळला नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याला एकदिवसीय आणि टी२० संघातही स्थान देण्यात आले नाही.






