सप्टेंबर महिना म्हणजे सणांचा जल्लोष, गणपती बाप्पाच्या गजरात भरलेलं वातावरण आणि आनंदाच्या उधळणीचा काळ. या सणासुदीच्या वातावरणात अल्ट्रा झकास मराठी ओटीटी आपल्या प्रेक्षकांसाठी खास मनोरंजनाची मेजवानी घेऊन येत आहे. या महिन्यात प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी प्रेक्षकांना मराठी चित्रपटांसोबतच हिंदी आणि साऊथ ब्लॉकबस्टर सुपरहिट चित्रपट मराठीत अनुभवायला मिळणार आहेत. यामध्ये खास आकर्षण ठरणार आहे नुकताच थिएटरमध्ये हाऊसफुल्ल ठरलेला आणि प्रेक्षकांची दाद मिळवणारा बेटर-हाफ ची लव्हस्टोरी.
हा सिनेमा १९ सप्टेंबर रोजी ओटीटीवर प्रेक्षकांसमोर येणार असून, सुबोध भावे, रिंकू राजगुरू आणि प्रार्थना बेहरे यांच्या दमदार अभिनयामुळे हा सिनेमा प्रेक्षकांना भरपूर हसवणार, रडवणार आणि खिळवून ठेवणार आहे. त्याचबरोबर ५ सप्टेंबरला उर्मी हा रहस्यमय आणि भावनिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. चिन्मय उदगीरकर, सायली संजीव आणि रसिका सुनील यांच्या अभिनयाने सजलेला हा सिनेमा भूतकाळ आणि नातेसंबंधांच्या गुंतागुंतीतून उलगडणारी हृदयस्पर्शी कथा मांडतो.
१२ सप्टेंबरला प्रदर्शित होणारा गोंधळात गोंधळ (FCUK) हा साऊथ ड्रामा प्रेक्षकांना नात्यांच्या गोंधळातून हसवत-मनोरंजन करत ठेवणार आहे. तर २६ सप्टेंबरला चार चौघी (Lipstick Under My Burkha) हा समाजातील परंपरा आणि बंधनांना आव्हान देणारा सशक्त स्त्रियांच्या संघर्षाचा आणि स्वप्नांचा प्रवास दाखवणारा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. कोंकणा सेन शर्मा आणि रत्ना पाठक सारख्या दमदार अभिनेत्रींच्या भूमिकेमुळे हा चित्रपट नक्कीच लक्षवेधी ठरणार आहे.
अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि. चे सी.ई.ओ. सुशीलकुमार अग्रवाल यांच्या मते, या महिन्यातील प्रत्येक कंटेंट हा फक्त करमणूक न राहता प्रेक्षकांच्या मनाला भिडेल आणि विचारांना चालना देईल असा असेल. शिवाय अल्ट्रा झकास मराठी ओटीटी Android, iOS, टॅब, वेब, Android TV, Fire TV, Jio Store आणि Cloud TV वर सहज उपलब्ध असल्याने प्रेक्षक कुठेही, कधीही या झकास मनोरंजनाचा आनंद घेऊ शकतात. त्यामुळे या सणासुदीच्या वातावरणात अल्ट्रा झकास मराठी प्रेक्षकांना घरबसल्या सणांचा आणि मनोरंजनाचा दुहेरी जल्लोष देणार आहे.