मुंबईत खुल्या जागांवर वृक्षारोपण! महानगरपालिकेतर्फे गृहनिर्माण सोसायट्यांनाही मिळणार
मुंबईतील हरित क्षेत्र वाढवण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाला गती देण्यासाठी पालिकेने शहरातील विविध विकास प्रकल्पांमधील तसेच आरक्षित असलेल्या खुल्या जागांवर आगामी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्याचे नियोजित केले आहे. यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाने विकास नियोजन विभागाकडे मुंबईतील अशा खुल्या जागांचा सविस्तर असून, हा अहवाल अहवाल मागवला + प्राप्त होताच प्रत्यक्षमोफत रोपे वृक्षलागवड मोहीम हाती घेतली जाणार आहे.(फोटो सौजन्य – istock)
मुंबईकरांना मोठा झटका! 29 जूनपासून बदलणार मध्य रेल्वेचे वेळापत्रक; ‘एसी’साठी १२ लोकल करणार बंद
पालिकेने केवळ सरकारी जागांवरच नव्हे, तर नागरिकांच्या थेट सहभागातून मुंबई हिरवीगार करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांना (सोसायट्यांना) मोफत वृक्षरोपे देण्याचा विशेष उपक्रमही जाहीर केला आहे.या उपक्रमांतर्गत स्थानिक नगरसेवक किंवा आमदार यांच्या माध्यमातून सोसायट्यांकडून अर्ज स्वीकारले जातील. अर्ज प्राप्त झाल्यानंतर उद्यान विभागाचे अधिकारी संबंधित सोसायटीमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून तिथे वृक्षलागवडीसाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे का आणि झाडांच्या देखभालीची तयारी आहे का, याची पडताळणी करतील. सोसायट्यांकडून आवश्यक ते हमीपत्र घेतल्यानंतरच रोपांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. झाडे लावल्यानंतर त्यांचे योग्य संगोपन करून ती जगविण्याची मुख्य जबाबदारी संबंधित सोसायट्यांचीच असणार आहे.
या मोहिमेत पालिकेकडून मुंबईच्या हवामानाला पूरक असणाऱ्या बहावा, कदंब, बकुळ, पिंपळ, वड यांसारख्या स्थानिक प्रजातींच्या लहान आणि मोठ्या अशा दोन्ही आकाराच्या रोपांना प्राधान्य दिले जाणार आहे.पावसाळ्यामध्ये जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतर ही प्रत्यक्ष लागवड सुरू होईल. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीच्या निमित्ताने महापालिकेकडून मुंबईकरांना तुळशीच्या रोपांचे मोठ्या प्रमाणावर मोफत वाटप करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वृक्षलागवड ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून दीर्घकालीन पर्यावरण संरक्षणाचा भाग आहे. म्हणूनच एका बाजूला ‘डीपी’ विभागाच्या माध्यमातून खुल्या जागा शोधून तिथे वनराई उभारली जाईल, तर दुसऱ्या बाजूला सोसायट्या आणि लोकप्रतिनिधींच्या सहभागातून मुंबईचे हरित क्षेत्र वाढवले जाईल. नागरिकांनी केवळ रोपे न घेता ती जबाबदारीने जगविण्यावर भर द्यावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.






