चंद्रपूर : घुग्घूस येथून मुंगोली खदाणीकडे खदानीकडे कोळसा भरण्याकरिता जाणारा ट्रक वर्धा नदीत कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी २४ एप्रिल रोजी रात्री १० ते ११ वाजताच्या दरम्यान घडली आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास ट्रक चालक भारत टेकम (४५) रा. घुग्घूस हा वेकोली वणी क्षेत्राच्या मुंगोली खदाणीकडे कोळसा भरण्याकरिता भरधाव वेगाने जात होता.
[read_also content=”पोलिसांनी सापळा रचून २२ पेट्या देशी दारूसह जप्त केली कार, पावणेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात https://www.navarashtra.com/maharashtra/police-set-a-trap-and-seized-22-boxes-of-liquor-along-with-a-car-and-rs-appoximataly-five-lakh-nraa-273107.html”]
यावेळी, भरधाव वेगाने जाणाऱ्या या ट्रकचा अचानक वर्धा नदीच्या पुलावर वाहनावरून नियंत्रण सुटले. आणि ट्रक वर्धा नदीत कोसळला. यात त्या ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या वर्धा नदीच्या पुलावर अनेक खड्डे पडले आहे. त्यामुळे, कोळशाची वाहने भरधाव वेगाने धावत असतात. आजपर्यंत येथे अनेक अपघात होऊन नाहक बळी गेला तर काही वाहन वर्धा नदीत कोसळून चालक व वाहकाचा बळी गेला आहे. परंतु, या पुलाकडे वेकोलीचे दुर्लक्ष होत आहे.