Uddhav Thackerays Attack On Bjp Government You Cant Do Projects Leaving My Local People In Wind
‘माझ्या स्थानिकांना तुम्ही वाऱ्यावर सोडून प्रकल्प करू शकत नाही, संपूर्ण महाराष्ट्र बारसूमध्ये उतरवेन’ बारसू प्रकल्पावरून उद्धव ठाकरे आक्रमक, केंद्रातील सरकारसह पंतप्रधान मोदींवरसुद्धा टीका
उद्धव ठाकरेंची आज कोकणात सभा झाली. उद्धव ठाकरेंनी आज भाजपवर जोरदार निशाणा साधला. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवरसुद्धा जोरदार टीका केली. त्याचबरोबर केंद्रावरसुद्धा जोरदार निशाणा साधला. बारसू प्रकल्पावरसुद्धा त्यांनी भाष्य केले. बारसूतील स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रकल्प करू नये, असे सांगितले.
रत्नागिरी : आज उद्धव ठाकरे यांनी महाड येथे सभा घेतली, त्यापूर्वी त्यांनी रॅलीदेखील केली. या सभेदरम्यान त्यांनी केंद्रातील सरकारसह महाराष्ट्रातील सरकारवर घणाघाती हल्ला केला. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले. त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. तसेच, त्यांनी महाराष्ट्रातील सरकारवरदेखील त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.
मुख्यमंत्र्यावर जोरदार टीका
महाराष्ट्र सोडून बाहेर मुख्यमंत्री बाहेर फिरताहेत, लाचार कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भांडी घासायला गेले. त्यांना महाराष्ट्रातील प्रश्नांबद्दल कोणतेही सोयरसुतक नाही.
शंभरवेळा बोलले पीएम मन की बात
कर्नाटकमध्ये धार्मिकतेच्या नावाखाली तुम्ही निवडणूक लढवता. माझे चिन्ह तुम्ही काढून गद्दारांना दिले, माझी शिवसेना नावसुद्धा तुम्ही त्यांना दिले. सत्यपाल मलिक यांनी केलेल्या खुलासावरील त्यांनी केलेल्या विधानाने खळबळ उडाली. पुलवामा हत्याकांडाबद्दल त्यांच्या विधानाने खळबळ झाली, तुम्ही त्याच्यावरसुद्धा राजकारण केले. बेंबीच्या देशासाठी लढतो, छातीवर गोळी झेलण्यासाठी तो असतो. बजरंग बलीची नाव घेऊन मतदान करण्याचे आवाहन करता हा कसला प्रचार आहे.
नाराण राणेंवर नाव न घेता टीका
कोकणात एक टिनपाट आहे, रोज माझ्यावर बोलत असतात. कारण त्यांचे पोट त्याच्याशिवाय चालत नाही.
मला हिंदुत्व सोडले असे सांगतात, मी कुठे हिंदुत्व सोडले, तुम्ही सांगा? भरसभेत विचारला उद्धव ठाकरेंनी प्रश्न विचारला.
Web Title: Uddhav thackerays attack on bjp government you cant do projects leaving my local people in wind