File Photo : Court Decision
मुंबई : अमरावती (Amravati) येथील व्यावसायिक (Businessman) उमेश कोल्हेची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सातही आरोपींना शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयाच्या (Mumbai Sessions Court) विशेष एनआयए न्यायालयाने (Special NIA Court) १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ( Judicial Custody) सुनवाली.
नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ समाज माध्यमावर संदेश प्रसारीत केल्यामुळे अमरावती येथील व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली. २१ जून रोजी अमित मेडिकल्सचे संचालक उमेशकोल्हे हे दुकान बंद करून मोटरसायकलने घरी जात असताना रात्री १०.३० च्या सुमारास श्याम चौकातील घंटाघर परिसरात चाकूने वार करून त्यांची हत्या करण्यात आली.
या प्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून मुदस्सीर अहमद ऊर्फ सोनू रजा शेख इब्राहिम (२२), शाहरुख पठाण ऊर्फ बादशाह हिदायत खान (२५), अब्दुल तौफिक ऊर्फ नानू शेख तस्लिम (२४), शोएब खान ऊर्फ भुऱ्या साबीर खान (२२), अतिब रशीद आदिल रशीद (२२), युसूफ खान बहादूर खान (४४) तसेच सूत्रधार शेख इरफान शेख रहीम (३५) सात जणांना अटक केली.
त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) या प्रकरणाचा तपास स्वतंत्ररीत्या करती आहे. सर्व आरोपींना देण्यात आलेली एनआयए कोठडी शुक्रवारी संपत असल्याने त्यांना विशेष न्यायालयात हजर कऱण्यात आले. त्याची दखल घेत न्यायालयाने सातही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.