वडगाव मावळमधून मराठा समाजाचा मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा मिळाला आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
Maratha Reservation : वडगाव मावळ : महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे मैदानामध्ये उतरले आहेत. जरांगे पाटील यांनी चलो मुंबईचा नारा दिला आहे. अंतरवली सराटीपासून जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईकडे रवाना झाला आहे. त्याचबरोबर गणेशोत्सवाच्या काळामध्ये जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे राज्य सरकारची धाकधुक वाढली आहे. कोर्टाच्या आणि राज्य सरकारच्या नियमावलीनंतर केवळ एक दिवस मनोज जरांगे पाटील यांना केवळ 5 हजार आंदोलकांसह आझाद मैदानावर आंदोलन करता येणार आहे. जरांगे पाटील यांना वडगाव मावळमधून देखील मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. यासह इतर मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील हे सकाळी शिवनेरी येथून निघाले आहे. मनोज जरांगे पाटील यांना प्रतिसाद देत लाखो वाहने मराठा बांधव पुणे मुंबई महामार्गावरुन मुंबईकडे रवाना होत आहे. मावळ तालुक्यातील मराठा आंदोलनकर्त्यांनी आरक्षण घेतल्याशिवाय परतणार नाही असा निर्धार व्यक्त केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मावळ तालुक्यातून मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात हजारो वाहनातून मराठा बांधव जाणार आहे. मावळ तालुक्यात महामार्गलगत शुभेच्छा बॅनर लावण्यात आले. ठिकठिकाणी साऊंड सिस्टिम लावून वातावरण निर्मिती केली जात आहे. शहरात तसेच ठिकाणी ठिकाणी जरांगे यांच्या ताफ्यावरती वरती पुष्पवृष्टी करण्यासाठी जेसीबी मशीन उभे करण्यात आले आहे. पुणे मुंबई महामार्गावरील वडगाव मावळ हद्दीतील वगगाव फाटा या ठिकाणी कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये, यासाठी जवळपास शेकडो पोलिस कर्मचारी ,होमगार्ड तैनात करण्यात असून पुणे मुंबई महामार्गावर वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांच्या फौजफाट्यासह चोख बंदोबस्त ठेवला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मावळमधून संघटन व नियोजन
मावळ तालुक्यातील प्रत्येक गावात वाडी व शहरामध्ये बैठक आयोजित करून संघटनात्मक जनजागृती करण्यात आली आहे आप आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी 100 चे दीडशे ॲम्बुलन्स तत्पर करण्यात आल्या आहेत. आंदोलनासाठी मावळ सह जिल्ह्यातून पाच ते दहा हजार स्वयंसेवकाची फौज सज्ज असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे
मावळ तालुक्यातील समाजयोगी उपक्रम
मावळ तालुक्यातील आंदोलन कर्त्यांसाठी एक घर एक भाकरी अन्नपुरवठा सुचित करण्यात आला आहे प्रवास व वाहतूक व्यवस्थेसाठी वाहन उपलब्ध करून देण्याचा उपक्रम मावळ तालुक्यात राबविण्यात येणार आहे