फोटो सौजन्य: Google
प्रपोज डे, टेडी डे, किस डे नंतर अखेर अनेक जणांचा आवडता दिवस आज उजाडला आहे. तो दिवस म्हणजेच व्हॅलेंटाइन डे. या दिवशी अनेक जण आपल्या प्रिय व्यक्तीसोबत निवांत वेळ घालवताना दिसतात. तर काही जण फिरायला जातात. पण जगातील सर्वात सुंदर क्षण म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तीसोबत आपलं लग्न होणे. याहीपेक्षा सुंदर गोष्ट म्हणजे आपण करत असलेल्या कार्यात जोडीदाराने सुद्धा आनंदाने भाग घेणे. आज आपण अशीच एक लव्ह स्टोरीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने प्रेमाचा खरा अर्थ काय असतो त्याबद्दल सांगितले आहे.
खरंतर एखादे सामाजिक करताना नातेवाईकांचे मन जाणून घेणे देखील महत्वाचे असते. त्यामुळेच तर बीडमधील एका जोडप्याला चक्क तीन वेळा लग्न करावे लागले. प्रीती व संतोष गर्जे असे या दाम्पत्याचे नाव आहे. आज आपण त्यांच्याच लव्ह स्टोरीबद्दल जाणून घेणार आहोत. तसेच ते 127 मुलांचे ‘आई-वडील’ कसे बनले त्याबद्दल देखील जाणून घेणार आहोत.
मंत्री चंद्रकांत पाटील ॲक्शन मोडवर; मुलींच्या फी माफीसाठी घेतला मोठा निर्णय
संतोष यांनी 12 वी पर्यंत तर प्रीती यांनी भारतीय कायद्यात पदवी घेतली आहे. 2011 साली आयोजित करण्यात आलेल्या ‘चलो युवा कुछ करके दिखाओ’ या शिबिरात संतोष मार्गदर्शनासाठी गेले. तिथेच संतोष यांची भेट प्रीती यांच्यासोबत झाली. त्यानंतर दोघांनी आपले फोन नंबर एकमेकांना शेअर केले. फ्रेंडशिप डे च्या निम्मिताने प्रीतीचा पहिला मेसेज संतोष याना आला. यानंतर दोघांमधील संवाद वाढत गेला.
संतोष यांना नेहमीच आपण करत असलेल्या कामासाठी एक योग्य जोडीदार हवी होती. ती त्यांना प्रीतीच्या रूपात भेटली. यानंतर त्यांनी प्रीतीला सहारा अनाथालय येथे बोलावले. 10 नोव्हेंबर 2011 ला दोघे गेवराईला आले. बांधावर गप्पा मारत असताना सूर्य मावळतीला जात असतानाच संतोष यांनी प्रीतीला आपल्या मनातील तिच्याविषयी असणारी फीलिंग सांगितली.
जास्तवेळ न थांबता उद्याच आपण लग्न करू असा प्रस्तावही संतोष यांनी प्रीतीसमोर ठेवला. त्याप्रमाणे 11 नोव्हेंबरला दुपारी 11:11 मिनिटांचा लग्नाचा मुहूर्त ठरला. आदल्या दिवशी ज्वेलर्सकडून 1 ग्रॅमचे मंगळसूत्र घेतले आणि ठरल्याप्रमाणे दोघांचा प्रेम विवाह झाला.
11 नोव्हेंबर 2011 मध्ये संतोष व प्रीती हे दोघेच कपिलधार येथे गेले. एका झाडाखाली थांबून त्यांनी एकमेकांचा पती पत्नी म्हणून स्वीकार केला. त्यानंतर प्रीती परत यवतमाळला गेल्या आणि तिथेच तीन महिने राहिल्या. त्यानंतर त्या फेब्रुवारीला आपल्या आई-वडिलांसोबत परतल्या. त्यांनी संतोष यांचे समाज कार्य पाहिले. तेव्हा ते अनाथालयात 35 मुलांचा सांभाळ करत होते. हे पाहून दोघांचा नोंदणी पद्धतीने 250 रुपयांत दुसरे लग्न झाले. संतोष यांचा लग्नाची बातमी त्यांचा आईला समजली आणि त्या रडत आल्या. नातेवाइक काय म्हणतील, असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित केला. आपल्या आईच्या समाधानासाठी सांतोष यांनी 18 मार्च 2012 ला पुन्हा तिसरे लग्न केले. त्यावेळी २०० वऱ्हाडी मंडळी त्यांच्या लग्नाला उपस्थति होते.
संतोष याना एक बहीण होती, ज्यांचा दुसऱ्या बाळंतपणात मृत्यू झाला. पहिल्या मुलीचा मेहुण्याने नीट सांभाळ न केल्याने तिचे हाल संतोष याना पाहवले नाहीत. त्यामुळे 2024 साली त्यांनी ‘सहारा’ अनाथालाय सुरू केले. सध्या येथे 47 मुलींसह एकूण 127 मुले आहेत, ज्यांचा सांभाळ आई-वडील बनून संतोष व प्रीती गर्जे करत आहे. संतोष यांच्या मुली स्वरा व ओवी या दोन मुलीही याच मुलांमध्ये असतात.