विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात, माविआचा एक अतिरिक्त उमेदवार
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज (2 जुलै) शेवटचा दिवस आहे. तर दुसरीकडे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्याची चर्चा होत असतानाच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनी महाविकास आघाडी विधान परिषदेत तीन उमेदवार देणार असल्याचे विधान केले आहे. त्यामुळे 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. असे असताना नेमका कोणाचा उमेदवार पडणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
विधानसभेतील सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार पाच जागांवर भाजप, दोन जागांवर शिंदे गट आणि दोन जागांवर अजित पवार गट असे मिळून महायुतीचे 9 उमेदवार निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडी त्यांच्याकडील संख्याबळाच्या जागेवर दोन उमेदवार सहज निवडून आणतील. मात्र तिसऱ्या जागेवरुन मिलिंग नार्वेकर किंवा विनायक राऊत यांना रिंगणात उतरवल्यास ठाकरे गट मतांची बेगामी कशी करणार, हा प्रश्नच होता.
भाजप
सदाभाऊ खोत
परिणय फुके
पंकजा मुंडे
अमित गोरखे
योगेश टिळक
काँग्रेस
प्रज्ञा सातव
शिवसेना ठाकरे गट
मिलिंद नार्वेकर
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
जयंत पाटील (शेकाप)
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
शिवाजी गर्जे
राजेश विटेकर
शिवसेना
भावना गवळी
कृपाल तुमाने