श्रीगोंदा : भाजपच्या युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी युवा नेते विक्रमसिंह पाचपुते (Vikramsinh Pachpute) यांची निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीचे पत्र भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी पाचपुते यांना दिले. पाचपुते यांनी निवडीनंतर लगेचच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आशीर्वाद घेत शुभेच्छा स्वीकारल्या.
भाजयुमोच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पाचपुते म्हणाले, ‘भारतीय जनता पक्ष आणि आमचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास आगामी काळात सार्थ ठरवण्याचा माझा प्रयत्न असेल. देवेंद्रजी फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, बबनरावजी पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना युवकांचे प्रश्न आणि त्यांच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी नक्कीच कार्यरत राहणार आहे’.