द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांचा उद्या मोर्चा, विविध मगण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर देणार धडक (photo Credit- X)
“शेतकऱ्यांच्या कष्टाला मान द्या, चोरुन आणि करमुक्त आयात होणाऱ्या बेदाण्याला विराम द्या.” अशी हाक देऊन द्राक्षे उत्पादक संघाच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण, संचालक जितेंद्र जाधव आणि महादेव लाड हे मोर्चाला मार्गदर्शन करणार आहेत.
मंगळवार, दि. २० जानेवारी रोजी सकाळी ११ वा.क्रांतिसिह नाना पाटील पुतळा एस.पी ₹.ऑफिस जवळ सांगली येथून हा मोर्चा निघणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे हा मोर्चा जाऊन जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.
Maharashtra Politics: मोठी बातमी! ग्रामपंचायतींवर प्रशासनराज येणार? ‘या’ जिल्ह्यात तब्बल 155…
जत शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था, घाणीचे साम्राज्य; नागरिकांचा संताप






