दारू विक्रेत्यांसोबत पोलीस प्रशासनाने कारवाई करून प्रश्न सोडवावा, कारवाई न झाल्यास जनवादी महिला संघटनेचा विशाल ठिय्या मोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आला. गावातील दारूबंदी मंडळ जिल्हा कचेरी येथे वाढती महागाई सोबतच पेट्रोल, डिझेल, गॅस, बेरोजगारी, शैक्षणिक खर्चात वाढ, महिला अत्याचार आदी प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
Follow Us:
Follow Us:
विस्तार
वर्धा : अखिल भारतीय लोकशाही महिला संघटना जिल्हा समितीची बैठक १५ मार्च रोजी जिल्हाध्यक्षा प्रतीक्षा हाडके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात अवैध दारूविक्रीला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
[read_also content=”गोंदियात ८ चिमुकल्यांमध्ये आढळला लर्निंग डिसऑर्डर, शिक्षक व पालकांनी लक्ष देण्याची गरज https://www.navarashtra.com/latest-news/vidarbha/gondia/learning-disorder-found-in-8-chimukals-in-gondia-teachers-and-parents-need-to-pay-attention-nraa-256525.html”]
दारूच्या वाढत्या अड्ड्यांमुळे वसाहतीतील शांतता भंग पावत आहे. त्यामुळे महिला व नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत तक्रारी करूनही प्रशासन दारूकडे लक्ष देत नसल्याने अनेक कुटुंबे मेटाकुटीला आली आहेत. दारू विक्रेत्यांसोबत पोलीस प्रशासनाने कारवाई करून प्रश्न सोडवावा, कारवाई न झाल्यास जनवादी महिला संघटनेचा विशाल ठिय्या मोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आला. गावातील दारूबंदी मंडळ जिल्हा कचेरी येथे वाढती महागाई सोबतच पेट्रोल, डिझेल, गॅस, बेरोजगारी, शैक्षणिक खर्चात वाढ, महिला अत्याचार आदी प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. पोलीस अधीक्षक, ठाणेदार, बीट जमादार, ग्रामीण विभागाचे पोलीस पटेल यांनी अवैध दारू बंद करावी. विशेष लक्ष घालून दारूबंदी करावी, अशी मागणी जिल्हा सचिव दुर्गा काकडे यांनी केली आहे.
[read_also content=”डॉक्टरनेच विकले सात लाखात नवजात बाळाला, नागपुरात सरोगसीच्या नावावर मोठी फसवणूक https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/doctor-himself-sold-seven-lakh-newborn-baby-a-big-scam-in-the-name-of-surrogacy-in-nagpur-nraa-256434.html”]
नवनियुक्त अधिकाऱ्यांचा सत्कार
यावेळी जिल्हाध्यक्षा प्रतीक्षा हाडके, जिल्हा सचिव दुर्गा काकडे यांचा सत्कार करण्यात आला. आगामी तीन वर्षात जिल्ह्यातील १०० नवीन गावात संघटनेचे काम करण्याचा संकल्प नूतन कार्यकारिणीने केला. छाया दारव्हेकर, जयश्री कंगाळे, दीपमाला मळेकर, शमा शेख, ममता खडतकर, लक्ष्मी इरपत, रेखा झाडे, कल्पना चौधरी, कांचन हिंगे, रमा चाटे, प्रतिभा बावनकुठे, अनिता यादव, कुंदा घंगारे आदी उपस्थित होते.
Web Title: Demand for stoppage of illegal sale of liquor warning of agitation by janwadi mahila sanghatana nraa