Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim News : रस्त्यावरील अवजड वाहतक तातडीने थांबवा! अकोली गावकऱ्यांचे रास्तारोको आंदोलन

तालुक्यातील तळेगाव बाजार ते अकोली रूपराव मार्गावर सुरू असलेल्या अवजड वाहतुकीविरोधात ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 18, 2026 | 09:06 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

तालुक्यातील तळेगाव बाजार, मालठाणा खुर्द, मालठाणा बु., मालपुरा, कळमखेड तसेच अकोली रूपराव या शिवारातून खंडाळा फाटा ते अकोली रूपराव या मार्गावर गेल्या दोन आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू आहे. या जड वाहतुकीमुळे रस्त्याची झपाट्याने दुरवस्था होत असून ती तात्काळ बंद करण्यात यावी, या मागणीसाठी अकोली येथील ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन छेडले. सकाळपासूनच ग्रामस्थ मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. त्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत आपला तीव्र संताप व्यक्त केला.

SSC Exam 2026: विद्यार्थ्यांची ‘परीक्षा’ सुरू; ‘कॉपीमुक्त अभियान’ अन् वैद्यकीय कारणास्तव अनुपस्थित…

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत तयार करण्यात आला आहे. या रस्त्याची वहन क्षमता केवळ १० टन इतकी मर्यादित आहे. मात्र प्रत्यक्षात या मार्गावर ७० ते ८० टन वजनाचे मातीने भरलेले ट्रक दिवस-रात्र धावत आहेत. क्षमतेपेक्षा अनेक पटीने अधिक वजनाची वाहने धावत असल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडू लागले आहेत. काही ठिकाणी रस्त्याची पृष्ठभाग पूर्णपणे उखडली असून बाजूचे खांदेही खचू लागले आहेत. त्यामुळे लहान वाहनचालकांसह दुचाकीस्वारांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

अवजड वाहनांच्या सततच्या रहदारीमुळे उडणाऱ्या धुळीचा मोठा फटका परिसरातील शेतकऱ्यांना बसत आहे. केळी, टरबूज, गहू, मका, हरभरा यांसारख्या पिकांवर धुळीचे थर साचत असल्याने पिकांची वाढ खुंटत आहे. उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. याशिवाय, धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली.

गावकऱ्यांनी सांगितले की, या संदर्भात संबंधित कंत्राटदाराकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या. मात्र कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. उलट वाहतूक पूर्वीपेक्षा अधिक वाढली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि तातडीने उपाययोजना व्हाव्यात यासाठी रास्तारोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दोन लाख आयटीआय विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण! मंत्री मंगलप्रभात लोढा यांची संकल्पना

आंदोलनादरम्यान काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत ग्रामस्थांशी चर्चा केली. अवजड वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी योग्य ती कारवाई केली जाईल, तसेच रस्त्याची पाहणी करून दुरुस्तीबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन देण्यात आले. मात्र ठोस कारवाई होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

ग्रामस्थांची मागणी आहे की, तात्काळ अवजड वाहतूक बंद करण्यात यावी, रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Washim news stop heavy vehicles on the road immediately

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 09:06 PM

Topics:  

  • Washim
  • Washim news

संबंधित बातम्या

Buldhana News : शून्य कुष्ठरुग्ण गाव सर्वेक्षणाला प्रारंभ; ९ लाखांहून अधिक नागरिकांची होणार तपासणी
1

Buldhana News : शून्य कुष्ठरुग्ण गाव सर्वेक्षणाला प्रारंभ; ९ लाखांहून अधिक नागरिकांची होणार तपासणी

Buldhana News : शेगाव आणि शिर्डीत उभारले जाणार फूड स्ट्रीट हब; केंद्र सरकारकडून २ कोटींचा निधी मंजूर
2

Buldhana News : शेगाव आणि शिर्डीत उभारले जाणार फूड स्ट्रीट हब; केंद्र सरकारकडून २ कोटींचा निधी मंजूर

मानोऱ्यात हागणदारीमुक्तीचा बोजवारा! उघड्यावर जाण्याचे प्रकार; आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
3

मानोऱ्यात हागणदारीमुक्तीचा बोजवारा! उघड्यावर जाण्याचे प्रकार; आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

बुलढाण्यात पाणीटंचाईवर प्रशासनाचा मोठा निर्णय; ५१ गावांत ५८ विंधन विहिरी आणि १० कुपनलिका मंजूर
4

बुलढाण्यात पाणीटंचाईवर प्रशासनाचा मोठा निर्णय; ५१ गावांत ५८ विंधन विहिरी आणि १० कुपनलिका मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.