वाशीम : कारंजा येथील गौरीने राष्ट्रीय स्तरावर वाशिमचे नाव गाजविले आहे. ज्युनिअर राष्ट्रीय डॉजबॉल असोसिएशनची स्पर्धा बंगलोर येथील सेंट फ्रान्सिस्को कॉलेज मध्ये २४,२५ व २६ जून रोजी पार पडली. या स्पर्धेत तिच्या अथक प्रयत्नांना यश आले आहे. तिने केलेल्या मेहनतीचे फळ तिला प्राप्त झाल्याचा आनंद सर्व वाशिमच्या जनतेला आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने व्दितीय स्थान पटकाविले आहे. त्यात कारंजा येथील गौरी तायडे हिने महाराष्ट्र संघाकडून सहभाग नोंदवत उत्कृष्ठ कामगिरी बजावली आहे. गौरी येथील भरारी स्पोर्टस फाउंडेशनची खेळाडू असून ती येथील व्यवसायिक दिलीप तायडे व आर.जे.सी. येथील शिक्षिका प्रगती तायडे यांची कन्या आहे. यशाचे श्रेय तिने क्रीडा प्रशिक्षक पराग व आई व वडील यांना दिले आहे.