कोलंबोमध्ये IND vs PAK महामुकाबल्यावर पावसाचे सावट! 'इतक्या' टक्के पावसाचा अंदाज (Photo Credit- X)
भारतीय संघाने आतापर्यंत आपले दोन्ही सामने जिंकून दमदार कामगिरी केली आहे. दुसरीकडे, पाकिस्ताननेही नेदरलँड्स आणि अमेरिकेविरुद्ध विजय मिळवून आपले आव्हान कायम ठेवले आहे. १५ फेब्रुवारीचा जो संघ जिंकेल, तो थेट ‘सुपर-८’ फेरीसाठी पात्र ठरणार आहे. त्यामुळे या सामन्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
श्रीलंकेच्या हवामान खात्याने जारी केलेल्या विशेष बुलेटिननुसार आग्नेय बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने १५ फेब्रुवारीला मुसळधार पावसाची शक्यता आहे. ‘अॅक्यूवेदर’च्या अंदाजानुसार, कोलंबोमध्ये रविवारी पावसाची शक्यता तब्बल ९३ टक्के आहे. नैसर्गिक धोका पूर्व चेतावणी केंद्राने १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजता सूचना जारी करून लोकांना हवामान बदलांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.
The Sri Lanka Department of Meteorology has issued a special weather bulletin warning that a low-pressure area is likely to form over the southeastern Bay of Bengal around February 15. The Natural Hazards Early Warning Centre, issuing the notice at 10.30 a.m. today, requested… pic.twitter.com/ZGzSjfYvmY — NewsWire 🇱🇰 (@NewsWireLK) February 13, 2026
IND vs PAK: पाकिस्तानचा धुव्वा उडवण्यासाठी टीम इंडिया सज्ज; हाय-व्होल्टेज लढतीसाठी भारतीय संघ रवाना
भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. हवामान अहवालानुसार संध्याकाळी ६ वाजता: पावसाची शक्यता ४९ टक्के आहे, ज्यामुळे नाणेफेकीला (Toss) विलंब होऊ शकतो. संध्याकाळी ७ वाजता सामन्याच्या सुरुवातीला पावसाची शक्यता कमी होऊन ती ९ टक्क्यांवर येईल, असाही एक अंदाज आहे. सामन्यादरम्यान तापमान २६ ते २८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. जरी पावसाचा जोर सामन्याच्या वेळी कमी होणार असल्याचे दिसत असले, तरी दुपारच्या पावसाने मैदान ओले राहिल्यास खेळ सुरू होण्यास उशीर होऊ शकतो. ढगाळ वातावरणामुळे वेगवान गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता असल्याने टॉसची भूमिका निर्णायक ठरेल.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.






