खरतर सातत्याने मला मंत्रीपदाच्या ऑफर होत्या, परंतु उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आमचा विश्वास आहे. बाळासाहेबांचे आम्ही निष्ठावंत सैनिक आहोत. माझ्या चौकशा सुरु आहेत. खरतर या चौकशा सुरु असताना सुध्दा वीस वर्षातला हिशोबसुध्दा मी त्यांच्याकडे दिलेला आहे. मात्र, ना. रविंद्र चव्हाण यांनी काल दिलेल वक्तव्य म्हणजे रविंद्र चव्हाण आणि नारायण राणे यांच्यामध्ये अंतर्गत धुसफूस समोर आल्याची टीका शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आ. वैभव नाईक यांनी केली.
खरतर काल रविंद्र चव्हाण यांचा नियोजित दौरा होता आणि त्या दौऱ्यामध्ये ते शासकीय विश्रामगृह कणकवली येथे ते येणार होते. उड्डाणपुलासंदर्भात त्यांनी त्या कामामध्ये बदल सुचवले आहेत आणि ते काम लवकर झाले पाहिजे म्हणून मी आणि कन्हैया पारकर शासकीय विश्रामगृहामध्ये जे कार्यकरी अभियंता सर्वगोड यांच्या समोरच भेटलो. त्यांना पत्र दिले. हे काम लवकर होण्यासाठी त्यात बदल सुचवू नका अशी त्यांना विनंती केली. मात्र ,खरतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उध्दव ठाकरेंचा दौरा झाला आहे. त्या दौऱ्यामुळे भाजपच्या सगळ्या लोकांमध्ये धडकी भरलेली आहे. आज भाजपला लोकसभेला सुध्दा उमेदवार मिळत नाही या जिल्ह्यामध्ये ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच ते भ्रमिष्ट झाले असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला.
सातत्याने उध्दव ठाकरे जिल्ह्यातील लोक पाठीशी राहिले आहेत. या दौऱ्यात अल्पावधीमध्ये हजारो लोक वेगवेगळ्या ठिकाणी एकाच ठिकाणी नाहीतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्या मतदार संघामध्ये सगळ्या तालुक्यामध्ये उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळेच रविंद्र चव्हाण हे जनतेची दिशाभूल करीत असल्याचा टोला आ. वैभव नाईक यांनी लगावला.






