Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय आहे हे ‘PADU’ मशीन? मुंबई महापालिका निवडणुकीत EVM मध्ये होणार मोठा बदल; भूषण गगरानी यांनी दिली माहिती

PADU EVM Controversy: मुंबई महापालिका निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या PADU मशीनवरून राज ठाकरेंनी संशय व्यक्त केला आहे. हे मशीन नक्की काय आहे आणि निवडणूक आयोगाने ते का आणले? वाचा सविस्तर

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 14, 2026 | 04:50 PM
काय आहे हे 'PADU' मशीन? मुंबई महापालिका निवडणुकीत EVM मध्ये होणार मोठा बदल (Photo Credit- X)

काय आहे हे 'PADU' मशीन? मुंबई महापालिका निवडणुकीत EVM मध्ये होणार मोठा बदल (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • मुंबई महापालिका निवडणूक
  • ‘PADU’ मशीनवरून राज ठाकरे आक्रमक
  • आयुक्तांनी स्पष्ट केला मशीनचा नेमका वापर
What is PADU Machine: मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या मतदानासाठी काही तास उरले असतानाच, ईव्हीएमला (EVM) जोडल्या जाणाऱ्या एका नवीन यंत्रणेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. निवडणूक आयोगाने यावेळी ‘प्रिंटिंग ऑक्सिलरी डिस्प्ले युनिट’ (PADU) वापरण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या मशीनबाबत राजकीय पक्षांना अंधारात ठेवल्याचा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे. या वादानंतर मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन ही मशीन नक्की काय आहे, याचे स्पष्टीकरण दिले.

काय आहे हे ‘PADU’ मशीन? (What is PADU Machine)

राज ठाकरेंच्या प्रश्नांना उत्तर देताना पालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी सांगितले की, PADU मशीन हे ईव्हीएमसाठी एक ‘बॅकअप डिस्प्ले’ म्हणून काम करेल. डिप्लॉय प्रिंटिंग ऑक्सिलरी डिस्प्ले युनिट (PADU).  हे मशीन बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिटला जोडले जाईल. जर मतदानादरम्यान किंवा मतमोजणीच्या वेळी मुख्य कंट्रोल युनिटचा डिस्प्ले अचानक बंद पडला किंवा तांत्रिक बिघाडामुळे अस्पष्ट झाला, तर ‘PADU’ मशीनवर ती आकडेवारी स्पष्टपणे पाहता येईल. हे एक साहाय्यक उपकरण (Auxiliary Device) आहे. ‘भेल’ (BHEL) या सरकारी कंपनीने त्याची निर्मिती केली आहे.

VVPAT पेक्षा वेगळी यंत्रणा

गगरानी यांनी स्पष्ट केले की, PADU आणि VVPAT मध्ये गोंधळ करू नये. VVPAT मधून मतदानाची छापील पावती मिळते, मात्र PADU मशीनमधून कोणतीही कागदी पावती (Slip) निघणार नाही. हे केवळ मोठी स्क्रीन असलेले डिस्प्ले युनिट आहे, जेणेकरून मतमोजणी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि दृश्यमान होईल.

निवडणूक आयोगाचा आणखी एक डाव! EVM मशीनला जोडलं नवीन मशीन, विरोधकांचा चढला पारा

राज ठाकरे यांचा गंभीर आरोप

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘PADU’ मशीनच्या पारदर्शकतेवर शंका उपस्थित केली आहे. ते म्हणाले, “या नवीन मशीनबद्दल कोणत्याही राजकीय पक्षाला आगाऊ माहिती देण्यात आली नाही. ही मशीन नेमकी दिसते कशी आणि ती काय काम करते, हे कोणालाच माहीत नाही. ईव्हीएम जुन्या झाल्याचे कारण देऊन नवीन काहीतरी घुसवण्याचा हा प्रयत्न आहे का? लोकसभा किंवा विधानसभेला नसलेले नियम महापालिकेतच का आणले जात आहेत?” असा संतप्त सवाल त्यांनी केला. तसेच, मतदानाच्या दिवसापर्यंत ‘डोअर टू डोअर’ प्रचाराच्या परवानगीवरही त्यांनी कडक शब्दांत टीका केली.

निवडणूक आयोगाचा नवीन घोळ, मनाला वाटेल ते चालू आहे. 🤦🏽‍♂️#PADU #ElectionCommission pic.twitter.com/0cw7qrVDfi — Adarsh Kasar (@KasarAdarsh) January 14, 2026

मुंबईत १४० मशिन्स तैनात

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आयोगाकडून सध्या १४० PADU युनिट्स पाठवण्यात आली आहेत. ही मशिन्स प्रत्येक मतदान केंद्रावर असतीलच असे नाही, तर आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास ती वापरली जातील. सध्या ही यंत्रणा केवळ बॅकअप पर्याय म्हणून उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता सर्वांचे लक्ष उद्याच्या मतदानावर आणि या नवीन तांत्रिक बदलांमुळे प्रत्यक्ष प्रक्रियेत काय फरक पडतो, याकडे लागले आहे.

BMC Election 2026 : प्रचाराची रणधुमाळी थंडावली! मात्र बॅनरवरून नेत्यांचे फोटो गायब, मुंबईतील ‘त्या’ बॅनरची राज्यभरात चर्चा!

Web Title: What is padu machine evm update mumbai corporation election bhushan gagrani

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2026 | 04:50 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Election News
  • EVM Machine
  • Maharashtra Local Body Election

संबंधित बातम्या

सत्ता, पैसा आणि निवडणुका: महेश झगडे यांचं थेट, बेधडक भाष्य – EXCLUSIVE
1

सत्ता, पैसा आणि निवडणुका: महेश झगडे यांचं थेट, बेधडक भाष्य – EXCLUSIVE

PMC Election मध्ये पीएमपी व्यस्त? प्रवाशांना मोठा फटका; १,७५० पैकी ‘इतक्या’ बस आरक्षित
2

PMC Election मध्ये पीएमपी व्यस्त? प्रवाशांना मोठा फटका; १,७५० पैकी ‘इतक्या’ बस आरक्षित

Municipal Election 2026:  कधी झाली महापालिका निवडणुकांची सुरूवात, काय आहे यामागचा उद्देश?
3

Municipal Election 2026: कधी झाली महापालिका निवडणुकांची सुरूवात, काय आहे यामागचा उद्देश?

Bmc Election 2026: मतदानापूर्वी ठाकरे बंधू मुंबादेवीच्या चरणी! उद्धव आणि राज ठाकरेंनी सहकुटुंब घेतले दर्शन; विजयासाठी साकडं
4

Bmc Election 2026: मतदानापूर्वी ठाकरे बंधू मुंबादेवीच्या चरणी! उद्धव आणि राज ठाकरेंनी सहकुटुंब घेतले दर्शन; विजयासाठी साकडं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.