नेरळ येथील शिवसेना शाखा कार्यालय येथील रस्ता वाहतुकीस कधी होणार खुला?
कर्जत: नेरळ गावातील मुख्य बाजारपेठ भागातील शिवसेना शाखा येथे जाणारा रस्ता रस्त्यावर बांधलेल्या फुटपाथ यामुळे बंद झाला होता.शिवसेना शाखा आणि शेतकरी भवन यांच्याकडून हा रस्ता लहान वाहने यांच्यासाठी खुला करण्याची मागणी नेरळ ग्रामपंचायत कडे करण्यात आली होती. दरम्यान नेरळ ग्रामपंचायत कडून हा रस्ता खुला करण्याची कार्यवाही करण्यात आली असून येथे नव्या काँक्रीटीकरण करून घेण्यात आले.
२०१७- २०१८ मध्ये नेरळ गावातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात आले.त्यावेळी नेरळ माथेरान रस्त्यावरील बाजारपेठ भागातील शिवसेना शाखा कार्यालय कडे जाणारा रस्ता फूटपाथ उंच झाल्याने बंद करण्यात आला होता.मागील काही वर्षात वाहनांची संख्या वाढली आहे आणि वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे लहान वाहने यांच्यासाठी मदतगार ठरू शकेल असा कर्वे डॉक्टर आणि शिवसेना शाखा येथील रस्ता खुला करावा अशी मागणी होत होती.दोन वर्षापूर्वी कर्वे हॉस्पिटल भागातील रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आल्यावर येथील रस्ता लहान वाहने यांच्यासाठी खुला झाला होता.
मात्र शिवसेना शाखा कार्यालय येथील रस्ता अजूनही खुला करण्यात आला नव्हता. त्यामुळे नेरळ बाजारपेठ भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी शिवसेना शाखा मध्यवर्ती कार्यालयाने नेरळ ग्रामपंचायत कडे पत्रव्यवहार करून रस्ता खुला करण्याची मागणी केली होती.त्यानंतर हा रस्ता खुला करण्यास कोणाचा विरोध आहे काय? याबद्दल स्थानिकांच्या तक्रारी असल्यास त्या देण्याच्या सूचना नेरळ ग्रामपंचायता कडून फलक लावून मागवल्या होत्या.मात्र हा रस्ता लहान वाहनांसाठी खुला करण्याबाबत कोणीही तक्रारी केल्या नाहीत आणि त्यामुळे हा रस्ता खुला करण्याची कार्यवाही नेरळ ग्रामपंचायतीने केली.
शिवसेना शाखा कार्यालयाकडे येणारा रस्ता खुला करताना १० मार्च रोजी रात्री नेरळ ग्रामपंचायत कर्मचारी यांनी ग्रामपंचायत अधिकारी अरुण कार्ले यांच्या उपस्थितीत काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरू केले.रात्री उशिरा पर्यंत येथे वाहने यांना ये जा करण्यासाठी उतरती बाजू असे काँक्रीटीकरण करण्यात आले.त्यावेळी शिवसेन शाखेचे पदाधिकारी आणि शेतकरी भवन मधील गाळे धारक तसेच पाठपुरावा करणारे पंढरीनाथ हजारे हे उपस्थित होते.ग्रामपंचायत अधिकारी यांच्या देखरेखीत हा रस्ता खुला करण्यासाठी नव्याने काँक्रीटीकरण करण्यात आले आहे.तर या रस्त्यावर कोणीही वाहने पार्किंग करून ठेवू नये तसेच पार्क करून ठेवलेल्या वाहनांवा पोलिसांनी कारवाई करावी असे फलक लावले जाणार आहेत.सध्या ते काँक्रिट ओलसर असल्याने वाहने यांच्यासाठी हा रस्ता पाच दिवसांनी सुरू होणार आहे.या कामाबद्दल नेरळ ग्रामपंचायत चे नेरळ मधील व्यापाऱ्यांनी कौतुक केले आहे.