Photo Credit -Social Media
पुणे : गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या संपर्कात असून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवारप यांची भेटही घेतली होती. त्यानंतर ते तुतारीच्या चिन्हावरून निवडणूक लढवणार असल्याच्याही चर्चा सुरू झाल्या
पण या सर्व चर्चांदरम्यान इंदापूरमध्ये मात्र वेगळ्याच हालचाली सुरू होत्या. आज (29 सप्टेंबर) इंदापूर तालुक्यातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी शरद पवार यांची गोविंद बागेतील निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या सर्व इच्छुक उमेदवारांनी आपले म्हणणे सविस्तरपणे मांडत हर्षवर्धन पाटील यांना इंदापूरमधून उमेदवारी देण्यास विरोध केला. प्रवीण माने, अशोक घोगरे, तेजसिंह पाटील, यांच्यासह काही इच्छुकांनी शरद पवारांची भेट घेतली.
हेही वाचा:“जुने विचार आणि कार्यपद्धती असती तर ही कामे झालीच नसती”, नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर टीका
यावेळी राष्ट्रवादी हर्षवर्धन पाटलांना पक्षात घेणार का? असा प्रश्न विचारण्यात आला, त्यावर शरद पवार यांनी उपस्थितांना स्पष्ट शब्दात उत्तर दिले. त्याचवेळी शरद पवारांना भेटण्यासाठी आलेल्यांनी इंदापुरातून निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी केली. नको माजी, नको आजी, आम्हाला हवा नवा बाजी, अशा शब्दांत कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्या केल्या. पण दुसरीकडे शरद पवार गटात येण्यासाठी इच्छुक असलेल्या हर्षवर्धन पाटील यांची मात्र कोंडी झाली आहे. त्यामुळे यातून ते कसा मार्ग काढतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
तसेच, सर्वांशी विचारविनिमय करून इंदापूरचा निर्णय घेतला जाईल. यंदा इंदापूरमध्ये बदल घडणार आहे. त्यामुळे ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे. त्यांनाच उमेदवारी दिली जाईल, पुढच्या काही दिवसांत उमेदवार निश्चित केला जाईल, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
हेही वाचा:महिला T20 विश्वचषकाला फक्त चार दिवस शिल्लक, वाचा संपूर्ण वेळापत्रक