"जुने विचार आणि कार्यपद्धती असती तर ही कामे झालीच नसती", नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राला मोठी भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 11,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. पीएम मोदी पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या विभागाचे उद्घाटन केले असून ज्यामध्ये पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होईल. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यानच्या भुयारी भागाची किंमत अंदाजे 1,810 कोटी रुपये आहे. तसेच महाराष्ट्रातील 11 हजार 200 कोटींच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली. यावेळी मराठीत भाषणाला सुरुवात करत ते म्हणाले, “पुण्यातील सर्व लाडक्या बहीण-भावांना माझा नमस्कार. पुण्यात येऊ शकलो नाही, यात माझं नुकसान आहे.” तसेच भाषणादरम्यान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर टीका केली.
“पुण्याच्या कणाकणात राष्ट्रभक्ती आणि समाजभक्ती आहे. अशा पुण्यात येणं हे ऊर्जावान बनवणारं आहे. त्यामुळे पुण्याला येता न आल्याने माझं मोठं नुकसान झालंय. पण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुमची भेट घेण्याची संधी मिळाली. पुण्याची धरती महान विभूतींची आहे. महाराष्ट्राच्या विकासाची नवी साक्षीदार होत आहे”, असं मोदी म्हणाले.
जुने विचार आणि कार्यपद्धती असती तर ही कामे झालीच नसती. मागच्या सरकारला आठ वर्षात मेट्रोचा एक पिलरही उभा करता आला नाही. पण आमच्या सरकारने पुण्यात मेट्रोचं आधुनिक नेटवर्क तयार केलं आहे, असे नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता सांगितले.
तर पुणे मेट्रो फेज-१ च्या स्वारगेट ते कात्रज विस्ताराची पायाभरणी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यासाठी अंदाजे 2,955 कोटी रुपये खर्च येणार आहे. अंदाजे 5.46 किमीचा हा दक्षिण विभाग मार्केट यार्ड, पद्मावती आणि कात्रज या तीन स्थानकांसह पूर्णपणे भूमिगत आहे. तसेच राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमांतर्गत 7,855 एकर क्षेत्र व्यापणारा बिडकीन औद्योगिक क्षेत्र पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करण्यात आले. तर दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या या प्रकल्पात मराठवाडा विभागातील एक दोलायमान आर्थिक केंद्र म्हणून प्रचंड क्षमता असल्याचे पीएमओने म्हटले आहे. केंद्र सरकारने 6,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या या प्रकल्पाला तीन टप्प्यांत विकासासाठी मंजुरी दिली आहे.
तर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सोलापूर विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. ज्यामुळे कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय सुधारणा होईल आणि सोलापूर पर्यटक, व्यावसायिक प्रवासी आणि गुंतवणूकदारांसाठी अधिक सुलभ होईल. पीएमओच्या म्हणण्यानुसार, सोलापूरमधील सध्याची टर्मिनल इमारत वार्षिक अंदाजे 4.1 लाख प्रवाशांना सेवा देण्यासाठी पुनर्बांधणी करण्यात आली आहे.