नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये (Mumbai Crime Case) प्रेमसंबंधातील संशयावरुन एका महिलेची हत्या (Murder Case) करण्यात आली आहे. 24 वर्षीय मुलाने खून केल्याच्या घटनेमुळे शहरामध्ये खळबळ निर्माण झाली आहे. प्रायव्हेट बॅंकमध्ये नोकरी करत असलेल्या महिलेचे दुसरे प्रेमसंबंध असल्याच्या संशयाने हा खून करण्यात आला आहे.
नवी मुंबई शहरामध्ये 35 वर्षीय महिला प्राव्हेट बॅंकमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होती. तिचे 24 वर्षीय मुलासोबत संबंध होते. कामाच्या निमित्ताने तिला अनेक लोकांशी भेटीगाठी कराव्या लागत असतं. अनेक लोकांसोबतचे तिचे हे बोलणे तिच्या 24 वर्षीय प्रियकराला पटले नाही. तिचे दुसऱ्या सोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय त्याच्या मनामध्ये दाट झाला.
सोमवार (दि.08) रोजी एका हॉटेलमध्ये भेटायला बोलावले. हॉटेलमध्ये गेल्यावर प्रियकराने महिलेला या नाराजी बद्दल सांगितले. मात्र याबद्दल बोलताना त्यांच्यामध्ये भांडण झाली. मात्र ही भांडण एवढ्या विकोपाला गेली की प्रियकराला त्याचा राग अनावर झाला. आणि रागाच्या भरामध्ये प्रियकराने महिलेचा गळा दाबून खून केला. यानंतर प्रियकराने हॉटेसमधून पळ काढला.
हॉटेल स्टाफला याबाबत कळल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. खून झाल्यानंतर पुढच्या चोवीस तासांमध्ये पोलिसांनी आरोपी प्रियकराला त्याच्या घरातून अटक केली.
आरोपी प्रियकर त्याच्या मूळ घरी उत्तर प्रदेशामध्ये पळून जाण्याचा विचार करत होता. एका गुप्त माहितीवर कारवाई करत, मुंबई पोलिसांनी आरोपी शोएब शेख (वय वर्ष 24) याला साकी नाका येथील त्याच्या घरातून पहाटे अटक केली, तो उत्तर प्रदेशातील त्याच्या गावी पळून जाण्यापूर्वी, एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. चौकशीत आरोपीने खुलासा केला की तो सोमवारी त्याची मैत्रिण एमी उर्फ अमित रवींद्र कौर (वय वर्ष 35) हिच्यासोबत हॉटेलमध्ये थांबला होता.