मुंबई – भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई विद्यापीठातून मिळवलेल्या डॉक्टरेट विरोधात युवासेना कलिना विद्यापीठात आंदोलन केलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई विद्यापीठातून मिळवलेल्या डॉक्टरेट विरोधात युवासेनेने कलिना विद्यापीठात आंदोलन केलं.
युवासेनेच्या मते किरीट सोमय्या यांनी मुंबई विद्यापीठातून मिळवलेली डॉक्टरेट बोगस आहे. तसेच किरीट सोमय्या यांनी मिळवलेल्या पीएचडीची माहिती विद्यापीठातून मिळत नसल्याची तक्रार युवासेनेने केली आहे.सोमय्या यांच्या पीएचडी प्रबंधाची प्रत नेमक्या कुठल्या विभागात आहे किंवा आहे कि नाही याबाबतची माहिती देण्यास विद्यापीठाकडून मागील तीन महिन्यापासून टाळाटाळ होत असल्याचा युवासेनेचा आरोप आहे. किरीट सोमय्या यांच्यावर कारवाई करावी यासाठी युवासेनेचे मुंबई विद्यापीठ कालिना कॅम्पस इथील आंबेडकर भवन इथे धरणं आंदोलन केलं.किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांची पोस्टर्स दाखवून किरीट सोमय्या यांचे डॉक्टरची चौकशी व्हावी अशी मागणी युवासेनेने केली.