Kokan ZP Election: चिपळूणमध्ये ईव्हीएम बिघाडामुळे खोळंबा; खेर्डीत मतदारांचा संताप, प्रशासनाकडून अतिरिक्त ५० मशिनची व्यवस्था
याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्याकडे संपर्क साधला असता ज्या ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाला आहे त्या सर्व ठिकाणी जवळपास 50 ईव्हीएम चे ज्यादा मशीन पाठविण्यात आले आहेत. तसेच कुठेही बिघाड झाल्यास पूर्वतयारी म्हणून ईव्हीएम जादा मशीन देखील उपलब्ध करण्यात येत आहेत. अशा स्वरूपाची माहिती लिगाडे यांनी दिली. तसेच साडेपाच पर्यंत जे मतदार मतदानाला येतील त्यांचे मतदान होईपर्यंत मतदानाची वेळ वाढवण्यात येईल,” असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
पीएमपीएलचा कारभार सुधारा, 690 बसेस कुठे आहेत? माहिती लपवल्याचा आरोप
रायगड जिल्ह्यात आज होत असलेल्या स्वराज्य संस्थेच्या निवडणूक प्रक्रियेचा मतदान आज सुरू आहे.मतदारांनी घराबाहेर पडून मतदान केंद्रावर जाऊन आपले मतदान करा, असे आवाहन 96 वर्षीय गणू भोईर यांनी केले. आज लोकशाहीचा उत्सव साजरा होत आहे. कर्जत तालुक्यात 220 मतदान केंद्रावर मतदान होणार असून एक लाख 70 हजार मतदार मतदान करणार आहेत.
सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समितीमध्ये होत असलेल्या निवडणुकीसाठी आपले मतदार राजांनी मतदान केंद्रावर जाऊन मत नोंदवावे आणि आपल्या ग्रामीण भागाचा विकासासाठी सक्षम आणि योग्य उमेदवाराला मतदान करावे यासाठी स्थानिक ग्रामस्थांकडून केले जात आहे. त्याचवेळी 96 वर्षीय गणू विष्णू भोईर यांनी आपल्या पत्नी पार्वती गणू भोईर वय वर्ष 88 यांच्या सोबतीने आपला मतदानाचा हक्क बजावत तरुणांनी ही आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. व लोकशाही बळकट केली पाहिजे यासाठी मतदान करा असे आव्हान या दांपत्याकडून करण्यात आले.
Bharat Shakti: क्वालालंपूरमध्ये मोदी लाट! 800 कलाकारांचा डान्स, 15,000 भारतीयांचा जल्लोष आणि
तालुका निहाय टक्केवारी
मंडणगड – ९.३१%
दापोली – ११. १६%
खेड – १०. ४६%
चिपळूण – ११. ३२%
गुहागर- १२. ६२%
रत्नागिरी – १२.२७%
संगमेश्वर – १०. ४२%
लांजा – ११.६९%
राजापूर – १०. ९१%
इतके मतदान झाले आहे.






