Raigad News: म्हसळा राजकारण तापलं! राष्ट्रवादीला रोखण्यासाठी पक्षांची हातमिळवणी, शेकाप-उबाठा-शरद पवार गट एकत्र
शुभ मंगल सावधान! मुलींच्या वाढत्या अपेक्षांमुळे मुलांची लग्न होणार तरी कधी?
तालुक्यात यापूर्वी पंचायत समिती ही राष्ट्रीय काँग्रेसची एका हाती सत्ता होती. तेव्हापासून राष्ट्रवादीने तालुक्यातील गावात विविध विकास कामातून आपली बाजू मजबूत केली होती. त्यानंतर शिवसेना एकत्र होती. शिवसेना फुटीनंतर शिंदे गटाची शिवसेना यांनी तालुक्यात देखील विकासकामाचा झंझावात सुरू केला. आपली देखील ताकद अजमावण्याचं काम यावेळी शिंदे शिवसेना करत आहे. त्याचबरोबर आता होणाऱ्या जिल्हा परिषद राष्ट्रवादीचे युवा उमेदवार भास्कर विचारे यांचे चिरंजीव अभिषेक विचारे त्यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाचे कुणबी समाज युवा प्रसाद बोरले तर दुसरे कुणबी समाजाचे उबाठाचे रोशन पारावे अशी तिरंगत असून येथे उमेदवार तरुण असल्याने आपल्या डिजिटल प्रचाराचा उपयोग करत आहेत. तरी या गटामध्ये राष्ट्रवादीची मोठ्या प्रमाणात ताकद आहे. शिंदे गटाचे प्रसाद बोलले आणि देखील स्टार प्रचारक नियोजन करून गावागावात पाठिंबासाठी धावपळ सुरू आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
शिवसेनेचे रोशन पारावे देखील मशाल घेत शेकापचा खटारा सोबत मैत्री करत त्यांनी देखील शिवसेनेच्या स्टाईलमध्ये प्रचार करत आपली बाजू भक्कम करीत आहेत. तालुक्यातील सर्वच गटांपेक्षा सर्वांचे लक्ष मात्र पांगलोळी गटाकडे लागले आहे. कारण एका बाजूला राष्ट्रवादी उपाध्यक्ष उद्योजक समाजसेवक सुनिल तटकरे यांचे निकटवर्तीय भास्कर दाजी विचारे यांचे चिरंजीव अभिषेक विचारे व दुसरीकडे शिवसेनेचे प्रसाद बोरले पण कुणबी समाजाचे असल्याने त्यांना देखील समाजाची सहानुभूती मिळते की कर्स? हे देखील पाहणे तितकेच गरजेचे आहे.
राष्ट्रवादी आपली ताकद पणाला लावत आपला गड कसा शाबूत ठेवता येईल? त्यासाठी राष्ट्रवादीचे नेते विकासकामांवर प्रचार करत आहेत. साळविडे सणात राष्ट्रवादीचे माजी कृषी सभापती बबन मनवे तर शिवसेना शिंदे गटाचे अमोल पैढारी उबाठाचे कृष्णा म्हात्रे, पांगगोली गणामध्ये शिवसेनेच्या स्यिा पाटेकर, उबाठाचे चैतन्या गजमल, राष्ट्रवादीच्या प्रियंका निबरे, पंचायत समिती खरसई गणामध्ये शिवसेनेचे महेश पाटील, उबाठाचे रमेश खोत, राष्ट्रवादीचे लहू म्हात्रे है रणांगणात असून पाभरे गणामध्ये राष्ट्रवादीचे समृद्धी चाचले, शिवसेनेच्या अमिता जाधव तर शेकापच्या ज्योती गीजे अशी लढत आहे.
ठाणे सिटीझन फोरमचा लढा ठरला यशस्वी…ट्रस्टला मिळाली ११६ कोटींची जमीन परत
प्रत्येक उमेदवार निवडून येण्यासाठी आपले नाते संबंध, समाजमाध्यमांचा वापर करून घराघरात प्रचार केला. गणांमध्ये उमेदवारांमध्ये चुरशीची लढत शिवसेना शिंदे गट-राष्ट्रवादी याच्यामध्ये दिसणार आहे. शेकापचे वर्चस्व जरी गावामध्ये नसले तरी उमेदवारांच्या नाती मैत्री ही तसं बंद समाज सर्व गोष्टीचा वापर शेकाप शिवसेना करत असल्याचे चित्र समोर दिसत आहे. त्यामुळे यावर्षीच्या जिल्हा परिषदेचे निकाल काय असतील? हे देखील पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे, आज प्रचार काळ संपला असला तरी मात्र सोशल मीडियावर आपले स्टार प्रचारक प्रचार करत आहेत. या सर्व प्रक्रियेवर निवडणूक आयोग आपली भिंगाचा चष्मा लावत कडकी नजर ठेवत आहे.
तर मेंदडी गटामध्ये शेकापचे माजी तालुका चिटणीस आगरी समाजाचे माजी उपाध्यक्ष संतोष पाटील हे उभे असून त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे अनिल बसवत शिवसेनेचे अकमल कादिरी या तिघांमध्ये लढत सुरू आहे. हा गट राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याने शेकापचे संतोष पाटील शिवसेनेचे अकमल कादरी याना आपली ताकद पणाला लावली लागणार आहे. यापूर्वी या विभागातून राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले होते. परंतु आता शेकापचे उमेदवार उबाठा सोबत मैत्री करत राष्ट्रवादीला रोखण्याचे काम करत आहेत.






