File Photo : Garden
छत्रपती संभाजीनगर : नागपूर येथील गोरेवाडा या पवनी वन परीक्षेत्रात तीन वाघ व एका बिबट्याचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यातील प्राणी संग्रहालये काही दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत तसे आदेश सर्व प्राणी संग्रहालयांना देण्यात आले आहेत.
हेदेखील वाचा : एकेकाळी पतीपेक्षा जास्त होती बिपाशा बासूची संपत्ती; आता नेटवर्थच्या बाबतीत पडली मागे, अभिनेत्री किती कोटींची मालकीन?
छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयही सुरूवातीला ६ ते ९ जानेवारीदरम्यान बंद राहणार आहे. एव्हीएन फ्ल्यू नावाचा तापाचा आजार नागपूरमधील प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांमध्ये दिसून आला आहे. या फ्लूमुळे तीन वाघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. इथल्या गोरेवाडा येथील तीन वाघांच्या मृत्यूनंतर आता केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्राणी संग्रहालय बंद करण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यातील इतर प्राणी संग्रहालये काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. ही घटना नागपूरची आहे व तूर्त राज्यातील इतर प्राणी संग्रहालयात कोणत्याही प्राण्याला कुठलीही संसर्गाची लक्षणे आढळून आलेली नाही. दरम्यान, नागपुरात वाघांची तब्येत खराब झाल्यावर त्यांचा मृत्यू झाला.
‘व्हायरस’ची धास्ती
दोन वाघ व बिबट्यांच्या या घटनेनंतर आता उद्यान प्रशासन जागे झाले आहे. जर ताप येऊन नाकातून पाणी येणे व आजारी प्राणी लंगडत असल्यास तो भाग आयसोलेट करावा, बिबट्या व वाघ राहत असलेले पिंजरे फिल्म गण वापरून र्निजंतुकीकरण करावे. कुठलीही लक्षणे दिसल्यास तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांस कळवावे.
प्राण्यांचे केअर टेकरांनीही काळजी घ्यावी
प्राण्यांचे केअर टेकर असलेल्यांनी हात स्वच्छ धुणे, खोकताना, शिंकताना रुमाल किंवा टिश्यू पेपर वापरावा. एव्हियन फ्लू किंवा एव्हियन इनफ्लूएन्झा आजार एच- 5, एन-1 व्हायरसमुळे होतो. हा विषाणू बदक, कोंबड्या आणि स्थलांतरित पक्ष्यांमध्ये आढळतो तो प्राण्यांमध्ये आणि माणसांमध्येही पसरू शकतो.
हेदेखील वाचा : बारामतीत आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा; महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखची हरियाणाच्या भोला ठाकूरवर मात