एकेकाळी पतीपेक्षा जास्त होती बिपाशा बासूची संपत्ती; आता नेटवर्थच्या बाबतीत पडली मागे, अभिनेत्री किती कोटींची मालकीन?
बॉलिवूडची बिल्लो रानी आणि बंगाली ब्यूटी म्हणून अभिनेत्री बिपाशा बसूने इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने आपल्या फिल्मी करियरमध्ये अनेक सुपर डुपर हिट सिनेमे दिले. आयटम साँगमुळेही बिपाशा चर्चेत आली होती. बिपाशाच्या करिअरपेक्षा तिच्या खासगी आयुष्याची अधिक चर्चा झाली. दरम्यान, अभिनेत्रीचा आज (७ जानेवारी) वाढविस आहे. बॉलिवूडमधील सर्वात हॉट आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक बिपाशा बसू तिच्या पती आणि मुलीसोबत ४६ वा वाढदिवस साजरा करीत आहे.
“त्यावर काम चालू आहे, लवकर बरं व्हायचंय…” तेजस्विनी पंडितला नेमकं झालंय तरी काय ?
गेल्या ८ ते ९ वर्षांपासून बिपाशा बासू फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे, पण तरीही ती कोट्यवधींची कमाई करते. एकेकाळी अभिनेत्रीची तिच्या पतीपेक्षाही जास्त तिची संपत्ती होती. बिपाशा मलायका अरोरा आणि सुजैन खानसह “द लेबल लाइफ” नावाचा क्लोदिंग ब्रँड चालवते. रिपब्लिक वर्ल्डच्या रिपोर्टनुसार, बिपाशा जवळपास १२४ कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. बिपाशाचा मुंबईतील वांद्रात एक अलिशान बंगला असून त्याची किंमत १६ कोटींच्या जवळपास आहे. सोबतच तिला लक्झरियस, महागड्या गाड्यांचीही बरीच आवड आहे.
दरम्यान, बिपाशाकडे कार कलेक्शनमध्ये Porsche Cayenne कार आहे ज्याची किंमत ७० लाख ते १.५ कोटी रुपये इतकी आहे. याशिवाय बिपाशाकडे ७२ लाख रुपयांची ऑडी Q7 आणि २५ लाख रुपयांची फोक्सवॅगन बीटल ही कार आहे. फिल्म इंडस्ट्रीपासून दूर असलेली बिपाशा सर्वाधिक कमाई ब्रँड्स अँडोर्समेंटमधूनही करते. ती भारतासह विदेशातील अनेक ब्रँड्सची ‘ब्रँड ॲम्बॅसेडर’ही आहे. बिपाशा ब्रँड अँडोर्समेंटसाठी २ कोटी रुपये चार्ज करते.
‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री सना खान झाली दुसऱ्यांदा आई, व्हिडिओ शेअर करत दिली ‘गोड बातमी’
दिल्लीत जन्मलेल्या बिपाशाला अभिनय आणि मॉडेलिंग करण्याची तिची इच्छा तिला अभिनयक्षेत्रात घेऊन आली. १९९६ पासून बिपाशा बसू मॉडेलिंग क्षेत्रात सक्रिय आहे. तर, २००१ मध्ये बिपाशाने ‘अजनबी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. या चित्रपटातील तिने साकारलेल्या भूमिकेसाठी तिला ‘बेस्ट फिमेल डेब्यू’चा फिल्मफेयर मिळाला होता. पहिल्याच चित्रपटानंतर तिला इंडस्ट्रीतील वेगवेगळ्या दिग्दर्शकांकडून निर्मात्यांकडून अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. त्यानंतर बिपाशाने ‘कॉर्पोरेट’, ‘जिस्म’, ‘राझ’, ‘नो एंट्री’ आणि ‘रेस’ यांसारख्या अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रसिद्धीझोतात आली.
दरम्यान, १९९६ च्या काळात बिपाशा मॉडेलिंग करत असताना तिच्या आयुष्यात अभिनेता डिनो मोरियाची एन्ट्री झाली. याच दरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दोघांनीही एकमेकांना सहा वर्षे डेट केले. त्यानंतर दोघांनी ‘राज’ चित्रपटात एकत्र कामंही केलं. पण २००२ नंतर त्यांचं ब्रेकअप झालं. २००३ मध्ये आलेल्या ‘जिस्म’ चित्रपटांत बिपाशा आणि जॉन अब्राहमने एकत्र स्क्रिन शेअर केली होती. या चित्रपटानंतर दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पण काही वर्षांतच त्यांचं ब्रेकअप झालं. दोन ब्रेकअपनंतर बिपाशाने लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता.
“कळवते लवकरच…”, हातावर मेहंदी अन् हिरवा चुडा; समृद्धी केळकरच्या पोस्टने साऱ्यांचंच वेधलं लक्ष
पण, त्यानंतर बिपाशाच्या आयुष्यात करण सिंग ग्रोव्हरची एन्ट्री झाली आणि तिचं अख्खं आयुष्यच पालटलं. दोघांनीही २०१५ मध्ये रिलीज झालेल्या ‘अलोन’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. याच चित्रपटाच्या शुटिंगपासून दोघांची लव्हस्टोरी सुरू झाली. दोघांनी २०१६ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर तिने कायमचीच इंडस्ट्री सोडली. जरीही अभिनेत्रीने इंडस्ट्री सोडल्याचे अधिकृत सांगितले नसले तरीही ती २०१६ पासून कोणत्याही चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली नाही.