काही दिवसांपुर्वीच मनी लाँड्रिंग प्रकरणी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) जामीन मंजूर केला आहे. आता या प्रकरणी एक मोठी अपडेट आहे. 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने शनिवारी आपला जबाब नोंदवला. सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) संबधित काही महत्त्वाची माहिती तिनं दिल्याची सांगण्यात येत आहे. मात्र, तिनं नक्की काय सांगितलं ते अद्याप समोर आलं नाही आहे.
[read_also content=”आफताबला १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी, हत्येनंतर सायकोलॉजिस्टला केले डेट https://www.navarashtra.com/india/shraddha-aftab-flat-murder-case-dna-samples-of-shraddhas-father-match-348653.html”]
मनी लाँड्रिंग प्रकरणी सुकेश चंद्रशेखरची चौकशी सुरू असताना अभिनेत्री जॅकलिनचं नाव समोर आलं होतं. हे दोघं रिलेशनशिपमध्ये असताना त्याने जॅकलिनला अत्यंत महागड्या भेटवस्तू दिल्याचाही आरोप करण्यात करण्यात आला होता. या प्रकरणी तिची अनेकदा चौकशीही करण्यात आली. त्यांनतर ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात जॅकलीनही आरोपी आढळली होती. यानंतर तिने जामिनसाठी अर्ज केला होता. पटियाला हाऊस कोर्टाने 2 लाखांच्या जातमुचलक्यावर जॅकलिनला जामीन मंजूर केला. मात्र, कोर्टाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाण्यास तिला मनाई करण्यात आली. त्यानंतर आता जॅकलिनला काही नवीन खुलासे करायचे होते त्यामुळे तिने पटियाला कोर्टात जबाब नोंदवला आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणी तुर्तास जॅकलिन फर्नांडिसची जामीन मिळाला असला तरीही या प्रकरणी पुढची सुनावणी 12 डिसेंबरला होणार आहे. तिला 12 डिसेंबरपर्यंत कोर्टाने आरोप सिद्ध करण्यासाठी वेळ दिला आहे.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सुकेश चंद्रशेखरची चौकशी सुरू असताना अनेक बॉलिवूड अभिनेत्रींच नाव समोर आलं होतं. या प्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिजचही नाव समोर आलं. त्यानंतर तिची चौकशी करण्यात आली. सुकेशने 200 कोटींच्या मनी लाँड्रिंगच्या पैशातून बॉलिवूड अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. सुकेशने तिला एक घोडा गिफ्ट केला होता. ज्याची किंमत तब्बल 52 लाख आहे आणि प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेल्या एकूण 36 लाखांच्या 4 पर्शियन मांजरांचाही तिला गिफ्ट म्हणून दिल्याची माहिती समोर आली होती.