2024 हे राजकुमार रावचे वर्ष ठरत आहे हे सिद्ध केले आहे. आणि याचे कारण देखील तितकच खास आहे. या अभिनेत्याने ‘श्रीकांत’ आणि ‘मिस्टर आणि मिसेस माही’ सोबत दोन बॅक टू बॅक हिट चित्रपट दिले असून सर्वात पॉवर-पॅक परफॉर्मर म्हणून तो ओळखला जात आहे. प्रेक्षक आणि समीक्षकांना आवडणाऱ्या वैविध्यपूर्ण आणि आकर्षक भूमिका निवडण्याची त्याची हातोटी देखील यातून सिद्ध केली आहे. ‘श्रीकांत’ मधून राजकुमार राव ने अंध उद्योगपती श्रीकांत बोल्लाची भूमिका सहजतेने साकारली तसेच ‘मिस्टर अँड मिसेस माही’ ने त्याच्या अभिनयाचा कौशल्याची अनोखी बाजू मांडली आहे. या दोनी चित्रपटांनी केवळ त्याच्या अष्टपैलुत्व दाखवले नाही तर बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घातला आहे.
‘श्रीकांत’ या चित्रपट 50 कोटींच्या दिशेने वाटचाल करत असताना ‘मिस्टर अँड मिसेस माही’ हा राजकुमार रावचा 6.85 कोटी रुपयांसह पहिल्या दिवशीचा सर्वोत्कृष्ट ओपनिंग चित्रपट ठरला आणि त्याच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘स्त्री’ या चित्रपटाने 6.82 कोटींची कमाई केली होती. ‘श्रीकांत’च्या यशामुळे राजकुमार रावला अनेक समीक्षकांचे पुरस्कार मिळतील याची खात्री असली तरी ‘मिस्टर आणि मिसेस माही’च्या लोकप्रियतेमुळे अभिनेत्याला अनेक लोकप्रिय निवड पुरस्कार मिळतील याची खात्री आहे. एकत्रितपणे हे दोन्ही चित्रपट सिद्ध करतात की राजकुमार राव हा त्याचा स्वतःचा सर्वात मोठा बॉक्स ऑफिस प्रतिस्पर्धी आहे.
[read_also content=”राजकुमार रावने ‘श्रीकांत’ आणि ‘मिस्टर अँड मिसेस माही’सह बॉक्स ऑफिसवर केली तुफान कमाई https://www.navarashtra.com/latest-news/rajkummar-rao-stormed-the-box-office-with-shrikanth-and-mr-and-mrs-mahi-544114.html”]
तसेच राजकुमार राव या वर्षी आणखी दोन चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येणार असून, त्याच्या बॉक्स ऑफिसवरील यशाचा सिलसिला कायम ठेवण्यास तो सज्ज आहे. राजकुमार आगामी हॉरर-कॉमेडी ‘स्त्री 2’ मध्ये ‘विक्की’ ची भूमिका पुन्हा साकारताना दिसणार आहे. तर तो ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ मध्ये प्रथमच तृप्ती दिमरीसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. अभिनेत्याकडे त्याच्या पाइपलाइनमध्ये आणखी काही मनोरंजक प्रकल्प आहेत ज्यांची तो लवकरच घोषणा करेल.