DDLJ Movie Shahrukh Khan And Kajol Statue To Be Unveiled At London
यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनवण्यात आलेला शाहरुख खान आणि काजोलच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या ऑलटाइम ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या नावावर आणखी एक कामगिरी जोडली जाणार आहे. ह्या चित्रपटातील कलाकारांचा आता लंडनमधील लेस्टर स्क्वेअरमध्ये पुतळा बसवला जाणार आहे. लंडनमधील लेस्टर स्क्वेअरमध्ये पुतळा बसवणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. चित्रपटातील एका दृश्याचा वापर करुन शाहरुख आणि काजोलचा पुतळा ‘सीन्स इन द स्क्वेअर’ मध्ये बसवला जाणार आहे. ‘हार्ट ऑफ लंडन बिझनेस अलायन्स’ने ही घोषणा केली. २० ऑक्टोबर १९९५ साली रिलीज झालेला ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ चित्रपटाला यावर्षी ३० वर्षे पूर्ण होणार आहे. मुख्य बाब म्हणजे, राज- सिमरनच्या एव्हरग्रीन लव्हस्टोरीला यावर्षी ३० वर्षे पूर्ण होणार आहेत. यानिमित्त ही घोषणा करण्यात आली आहे.
आदित्य चोप्राचा दिग्दर्शक म्हणून ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटाने पूर्वी अनेक रेकॉर्ड्स स्वत:च्या नावावर कमावले असून अनेक पुरस्कारांनी या चित्रपटाला गौरविण्यात आले आहेत. लंडनमध्ये शाहरुख आणि काजोल अर्थात राज-सिम्रन या आयकॉनिक जोडीचा कांस्य पुतळा बसवला जाणार आहे. येत्या काही महिन्यांमध्ये या पुतळ्याचं अनावरण करण्यात येईल. २० ऑक्टोबर २०२५ रोजी चित्रपटाला ३० वर्षे होतील. त्याच्या आधीच या पुतळ्याचे अनावरण केले जाईल. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ चित्रपटाची केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही मोठ्या प्रमाणावर क्रेझ आहे. प्रामुख्याने या चित्रपटाने जगभरातील चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले, यामुळेच हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
UPDATE… Bronze statue of #SRK and #Kajol to be unveiled at #London’s #LeicesterSquare to mark 25th anniversary of #DDLJ… Will be unveiled in Spring 2021… The first ever #Bollywood movie statue erected in #UK… #DDLJ is directed by #AdityaChopra. pic.twitter.com/qqDgrnMipU
— taran adarsh (@taran_adarsh) October 19, 2020
घर बंद तरीही कंगना रणौतला आलं एक लाख रुपये वीज बिल; अभिनेत्री हिमाचल प्रदेश सरकारवर संतापली…
दरम्यान, लंडनमध्ये बॉलिवूड चित्रपटातील कोणत्या तरी पात्रांचा पुतळा उभारण्याची ही पहिलीच वेळ आहे. ‘हार्ट ऑफ लंडन बिझनेस अलायन्स’ने आज पुतळा उभारण्यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. लेस्टर स्क्वेअरमधील ‘सीन्स इन द स्क्वेअर’ चित्रपटाच्या ट्रेलमध्ये हा नवीन पुतळा बसवला जाणार आहे. याठिकाणी सध्या ‘हॅरी पॉटर’, ‘लॉरेल अँड हार्डी’, ‘बग्स बनी’, ‘सिंगिंग इन द रेन’मधील जीन केली, ‘मेरी पॉपिन्स’, ‘मिस्टर बीन’, ‘पॅडिंग्टन अँड डीसी सुपर-हिरो बॅटमॅन’ आणि ‘वंडर वुमन’ या चित्रपटांमधील पुतळे आहेत. आता यांच्या जोडीला शाहरुख-काजोलचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’मधील पुतळा बसवला जाणार आहे.