(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
दिवाळीच्या सुट्टीत घरबसल्या काहीतरी मजेशीर, रोमान्स, अॅक्शन आणि कॉमेडीने भरलेलं पाहायचंय? मग ‘परम सुंदरी’ हा चित्रपट तुमच्यासाठी परफेक्ट आहे! ऑक्टोबर महिन्यात अनेक उत्तम चित्रपट आणि वेब सिरीज डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांची केमिस्ट्री, धमाल गाणी आणि थरारक कथानक असलेला हा चित्रपट आता प्राइम व्हिडीओवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहे. ‘परम सुंदरी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. विशेषत: चित्रपटाच्या गाण्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली होती. ज्यांनी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नाही, त्यांच्यासाठी आता वीकेंडला घरबसल्या मनोरंजनाची ही एक उत्तम संधी आहे. ‘परम सुंदरी’ आता ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओवर उपलब्ध झाला आहे. पण, यात एक ट्विस्ट आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना पैसे मोजावे लागणार आहेत. पण तुमचं वीकेंड किंवा दिवाळीतील एखाद्या संध्याकाळासाठी खास मनोरंजन शोधत असाल, तर ‘परम सुंदरी’ नक्कीच हिट ठरेल!
सध्या बॉलिवूडमधील हिट जोडी सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूरचा ‘परम सुंदरी’ हा बहुचर्चित चित्रपट प्राइम व्हिडीओवर भाड्याने (Rent) पाहण्यासाठी उपलब्ध आहे. मात्र, त्यासाठी प्रेक्षकांना ३४९ रुपये मोजावे लागतात, जे एका थिएटर तिकिटापेक्षा जास्तच आहे. त्यामुळे अनेक प्रेक्षकांनी इतकी किंमत देऊन चित्रपट पाहण्याऐवजी मोफत स्ट्रीमिंगची प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रेक्षकांसाठी दिलासा देणारी बातमी म्हणजे,२४ ऑक्टोबरपासून ‘परम सुंदरी’ हा चित्रपट प्राइम व्हिडीओ सबस्क्राइबर्ससाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध होणार आहे.म्हणजेच, दिवाळीच्या सुट्टीत घरच्या घरी, कोणताही अतिरिक्त खर्च न करता, तुमच्या प्राइम सबस्क्रिप्शनवर तुम्ही या अॅक्शन-रोमॅन्स आणि गाण्यांनी भरलेल्या धमाकेदार चित्रपटाचा आनंद घेऊ शकता.