पुणे : बॅालिवूड (Bollywood) अभेिनेता जॅकी श्रॅाफ (Jackie Shroff) हे नेहमीचं त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जातात. त्यांच्या याचं साधेपणाचं रूप पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे. जॅकी श्रॅाफ यांच्या पुण्यातील फार्महाऊसमध्ये देखरेखीचं काम करणाऱ्या घरगड्याच्या वडिलांच निधन झालं. याबद्दल माहिती होताचं जग्गूदादानं सरळ पुणे गाठलं आणि तातडीने घरगड्याच्या घरी भेट देत घरगड्याच्या कुटुंबीयांचं त्याने सांत्वन केलं.
पुण्यातल्याच (Pune) चांदखेडमध्ये जॅकीचं फार्महाऊस आहे आणि या फार्महाऊसच्या देखरेखीचं काम घरगड्या करतो. दरम्यान जॅकी यांना त्याच्या वडिलांच्या निधनाचं वृत्त कळताच त्यांनी माणुसकीचं दर्शन घडवतं घरगड्याच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं. सध्या सोशल मीडियावर जॅकी यांचे हे फोटो व्हायरल होत आहेत. घरगड्याच्या कुटुंबीयांसोबत जॅकी जमिनीवर बसल्याचं या फोटोंमध्ये पहायला मिळतंय. जॅकी यांची नम्रता आणि प्रामाणिकपणा पाहून नेटकरी भारावले आहेत. जॅकी यांचा जीवनाकडे पाहण्याचा एक स्पष्ट दृष्टीकोन आहे आणि विविधप्रसंगी ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, अनुभवांबद्दल मोकळेपणे इतरांसमोर व्यक्त होतात.
[read_also content=”राज्यात 1 एप्रिलपासून कोरोना निर्बंध शिथील होण्याची शक्यता, मात्र मास्कचा वापर बंधनकारक https://www.navarashtra.com/maharashtra/corona-restrictions-are-likely-to-be-relaxed-in-the-state-from-april-1-nrps-261657.html”]
बॉलिवूडच्या झगमगाटात असे अनेक कलाकार आहेत, ज्यांना ग्लॅमर, स्टेटस, प्रसिद्धी, फॅनफॉलोइंग यांची विशेष चिंता असते किंवा त्यांच्यामागेच पळणारे काही कलाकार आपल्याला पहायला मिळतात. मात्र लोकप्रियता, प्रसिद्धी आणि पैसा मिळाल्यानंतरही सामान्य माणूस म्हणून इतरांसोबत वागता यावं, यासाठीही काही कलाकारांची धडपड असते. जॅकी हे अशाच कलाकारांपैकी एक आहेत. गेलेल्या माणसाची सल भरून काढता येत नाही, मात्र सांत्वनाने दु:खाचा डोंगर कोसळलेल्या कुटुंबाला थोडंफार सावरण्यास नक्कीच मदत होते. हीच गोष्ट लक्षात घेऊन जॅकी श्रॉफ यांनी घरगड्याच्या कुटुंबीयांना भेट दिली.