जया बच्चन यांची आवडती गोष्ट कोणती ? 'कौन बनेगा करोडपती' च्या सेटवर बिग बींनी केला खुलासा
सोनी एंटरटेनमेंट टेलीव्हिजनवरील ज्ञानावर आधारीत गेम शो- ‘कौन बनेगा करोडपती सीझन १६’ मध्ये इंडिया चॅलेंजर वीकद्वारे आता रोमांचक ट्विस्ट आला आहे. या आठवड्यात १० स्पर्धकांपैकी फास्टेस्ट फिंगर फर्स्ट (FFF) राऊंडद्वारे दोन टॉप स्पर्धक लवकरात लवकर ५ बझर राऊंड पूर्ण करत हॉट सीटवर आपलं स्थान पटकावणार आहेत. त्यानंतर या बझर चॅलेंजचा विजेता पुढे खेळ खेळेल. सहाव्या प्रश्नाच्या मनी ट्रीपासून याची सुरुवात होईल. दिल्लीची प्रियंका ही इंडिया चॅलेंजर वीकमधील स्टँडआऊट स्पर्धक यापैकीच एक आहे. चिकाटी आणि ज्ञानाच्या जोरावर असामान्य संधी आपण कशाप्रकारे हस्तगत करू शकतो, याचे उत्तम आदर्श उदाहरण म्हणजे हा गेम शो आहे. प्रियंकाची शैक्षणिक प्रगती ते हा भारतातील प्रसिद्ध गेम असा प्रवास आदर्शवत आहे.
‘फसक्लास दाभाडे’ मध्ये इरसाल दाभाडे कुटुंबीयांची धमाल गोष्ट, चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज
हॉटसीटवर असताना प्रियंकाने अचानकपणे मस्त ट्विस्ट आणला. तिने अमिताभ बच्चन यांना अत्यंत खुमासदार आणि स्पष्ट प्रश्न विचारले. “तुमचं घर एवढं मोठं आहे, रिमोट हरवलं तर ते कसं शोधता.”. या प्रश्नापासून सुरुवात झाली. आपल्या विनोदासाठी प्रसिद्ध असलेले अमिताभ बच्चन म्हणाले, “मी थेट सेट टॉप बॉक्सजवळ जाऊन त्याद्वारे कंट्रोल करतो..”
पुढच्या संवादात प्रियंकाने मध्यम वर्गीय कुटुंबासंबंधी आणखी प्रश्न विचारले. या प्रश्नांमुळे प्रश्नमंजुषेच्या या कार्यक्रमात हास्यकल्लोळ उडाला. प्रियंकाने विचारले, “सर, मध्यमवर्गीय कुटुंबात रिमोट हरवलं तर भांडणं होतात. तुमच्याकडेही असं होतं का?”.. अमिताभ बच्चन म्हणाले, “नही देवी जी… हमारे घर में ऐसा नही होता.. सोफें पर दोन तकिये होते है.. रिमोट उस में छुप जाता है.. बस वहीं ढुंढना पडता है..”
प्रियंकाने पुढचा प्रश्न विचारला, “मी ऑफिसमधून घरी जाते तेव्हा मम्मी सांगते, येताना कोथिंबीर आण.. जया मॅडम तुम्हालाही असं काही आणायला सांगतात का? ” अमिताभ बच्चन म्हणाले, ” हो सांगतात ना.. तुम्ही स्वत:ला घरी आणा..”
चुम दारंग विवियन डिसेना आमनेसामने! म्हणाली – मी तुझ्यापेक्षा जास्तच…
प्रियंकाने शेवटचा प्रश्न विचारला, “सर, एटीएममधून कॅश काढायची असताना तुम्ही कधी बॅलेन्स चेक केलंय का?” अमिताभ बच्चन यांनी तत्काळ उत्तर दिलं, “मी माझ्याकडे कॅश बाळगतच नाही.. आणि मी कधी एटीएममध्येही गेलो नाही. ते कसं वापरतात, हे मला कळत नाही. पण जयाजींकडे कॅश असते.मी त्यांनाच पैसे मागतो. जयाजींना गजरा खूप आवडतो. तर रस्त्यात मी लहान मुलाकडून गजरा विकत घेतो. तो गजरा कधी जयाजींना देतो तर कधी गाडीतच ठेवतो. कारण त्याचा सुगंध मला खूप आवडतो.. ”
प्रियंकाचे खेळकर प्रश्न आणि मि. अमिताभ बच्चन यांची चपखल उत्तरं यामुळे हा एपिसोड विनोद आणि भावनिक क्षणांनी भारलेला ठरला. कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम कोट्यवधी लोकांना का आवडतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
कौन बनेगा करोडपती सिझन-16 मधील इंडिया चॅलेंजर वीकमधले हे विनोद आणि रोमांचक अनुभव पहायला विसरू नका. कौन बनेगा करोडपती.. रोज रात्री 9 वाजता..फक्त सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर…