फोटो सौजन्य - Social Media
बिग बॉस मराठी ६ वेगवेगळ्या वळणावर असतो. आताच राखी सावंतने या खेळात हटके एंट्री घेतली आहे. राखी चक्क इच्छदारी नागिणीच्या वेषामध्ये घरात आली आणि आपल्या अदांनी सगळ्यांचे मनोरंजन केले. राखी आली म्हणजे अनेकांच्या खेळाची राख तर होणारच! पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे राखीच्या येण्याने प्रेक्षकांचे मनोरंजन आणि त्याचबरोबर खेळाडूंचे मनोरंजनही होईल. यात काही शंका नाही. बिग बॉसने प्रोमो शेअर केला आहे.
शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये राखीचा पहिला वाद दिसून येत आहे. या घरामध्ये राखीने पहिला वाद अनुश्रीसोबत तेही सकाळसकाळी केला आहे. प्रोमोमध्ये दिसून येत आहे की अनुश्री राखीला जाप विचारते की तू माझ्या अंगावरची चादर का काढली? तेव्हा राखी तिला म्हणते की चार-चारवेळा गाणे वाजले आणि माझ्या डोक्याची नस फाटली तर… त्यावर अनुश्री तिला म्हणते की इथे दररोज चार वेळाच गाणी वाजतात. तुला त्रास होत असेल तर कानात बोटे घाल आणि गप्प बस!’
अनुश्रीने राखीला दिलेले हे उत्तर तिच्या चाहत्यांना मात्र फार भावले आहे. अनुश्रीच्या सपोर्टमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात प्रेक्षक असलेले दिसून येत आहेत. प्रोमोखाली ‘सातारची वाघीण अनुश्री माने’, ‘शेवटची ती वाई सातारची आहे’ तसेच ‘सातारची Queen’ असे कमेंट्स करण्यात आले आहेत तर काहींनी बिग बॉसमधील टोळी आता तुटणार असा विश्वास दाखवला आहे.
कॅप्स्टन्सीची शर्यत
कालचा दिवस हा राखीचा दिवस होता. राखीने घरामध्ये एंट्री घेतलीच तर तिला बिग बॉसने एक मोठी संधी दिली ती म्हणजे घरातल्या सदस्यांना कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाहेर काढणे. तर राखीने कॅप्टन्सीच्या या शर्यतीत ‘करण सोनावणे, तन्वी कोलते, सागर कारंडे, प्रभू शेळके आणि अनुश्री माने’ या सदस्यांची निवड केली आहे. या स्पर्धकांपैकी एका सदस्याला पुढच्या आठवड्यात कॅप्टन होण्याची संधी मिळणार आहे. या खेळातून विशाल कोटियनची थेट निवड करण्यात आली आहे.






