सौजन्य - सोशल मीडिया
बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, जे भाऊ- बहिण, भाऊ- भाऊ किंवा बहिणी- बहिणी आहेत. सारा अली खान- इब्राहिम अली खान, आयुष्मान खुराना- अपारशक्ती खुराना किंवा करीना कपूर- करिष्मा कपूर हे भाऊ बहिणींचं उत्तम उदाहरण आहे. या यादीमध्ये बहिणींची जोडी म्हणजे, प्रियांका चोप्रा आणि परिणिती चोप्रा… प्रियांका आणि परिणिती या बी-टाऊनमधल्या बहिणी नेहमीच चर्चेत असतात.
सध्या ह्या बहिणी चर्चेत येण्याचं कारण म्हणजे, प्रियंकाच्या भावाचा साखरपुडा… सिद्धार्थ चोप्राचा २६ ऑगस्टला साखरपुडा पार पडला. खास साखरपुड्यासाठी प्रियंका परदेशातून भारतात आली होती. पण या साखरपुड्यासाठी परिणीती दिसली नाही. प्रियांका आणि परिणितीमध्ये भांडण झाल्याचे बोलले जात आहे. खरंतर साखरपुड्याचा हा कार्यक्रम अगदी खासगी ठेवण्यात आला होता. मोजक्याच पाहुण्यांमध्ये हा साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला. असं असलं तरीही साखरपुड्याला अख्खं चोप्रा कुटुंबीय उपस्थित होतं. पण साखरपुड्यात कुठेही परिणीती चोप्रा दिसली नाही.
भाऊ सिद्धार्थ चोप्राच्या साखरपुड्यासाठी बहिण परिणीती नव्हती. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर प्रियांका चोप्रा आणि परिणिती चोप्रामध्ये काही वाद झालाय का ? अशी जोरदार चर्चा सुरू आहे. परिणीतीच्या लग्नावेळी प्रियंका गैरहजर होती. प्रियंका लग्नाला आली नाही म्हणून परिणीती प्रियंकावर नाराज तर नाही ना ? अशी जोरदार चर्चा सुरू आहे. जरीही ह्या सोशल मीडियावर चर्चा होत असल्या तरीही अद्याप परिणीती किंवा प्रियंकाने याबद्दल कोणतेही भाष्य केलेले नाही. शिवाय प्रियंका भारतात लवकरच प्रियंकाचा ‘पाणी’ म्हणून मराठी चित्रपट येतोय. याची निर्मिती प्रियंकाने केली आहे. याच्या प्रमोशनसाठीही ती आली होती.
परिणीती आणि प्रियंकाच्या कामाबद्दल सांगायचं तर, अलीकडेच परिणीतीचा ‘चमकिला’ हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाने चाहत्यांचं मन जिंकलं. तर प्रियंकाच्या कामाबद्दल बोलायचं तर, ती लवकरच ‘द ब्लफ’ चित्रपटाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान प्रियंका अनेकदा जखमी झाली आहे.