दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडेची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. तिचे देशभरात कोट्यवधी चाहते आहेत. अभिनेत्री पूजा हेगडे हिने अनेक बॉलिवूड आणि टॉलिवूड चित्रपटांत महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या पूजाचा इन्स्टाग्रामवर साऊथ इंडियन लूक तुफान व्हायरल होत आहे.
Pooja Hegde Saree Look
शाहिद कपूरच्या 'देवा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली पूजा हेगडे सध्या तिच्या नव्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे. तिने इन्स्टाग्रामवर सिंपल साडी कॅरी करत सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.
कायमच सोशल मीडियावर आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या पूजाने सिंपल साडी नेसून सुंदर फोटोशूट केले आहे. तिच्या सिंपलनेसने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
ओपन हेअर, सिंपल मराठमोळा अंदाज आणि लूकला साजेसा मेकअप करत अभिनेत्रीने सर्वांचेच लक्ष वेधले. तिच्या सौंदर्याचे चाहते जोरदार कौतुक करीत आहेत.
कायमच फॅशन आणि लूकमुळे चर्चेत राहणाऱ्या पूजाच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत. ती कायमच आपल्या फॅशनमुळे चाहत्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असते.
दरम्यान, पूजाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात येत आहे. पूजाने शेअर केलेल्या फोटोंवर १.१ मिलियन हून अधिक लाईक्सचा वर्षाव केला जात आहे.