बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण (Udit Narayan) यांचा मुलगा आदित्य नारायण (Aditya Narayan)अनेकदा चर्चेत असतो. बॉलिवूडमध्ये गायक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्यात आदित्य यशस्वी ठरला आहे. नुकताचं छत्तीसगडला त्याचा एक कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. जिथे त्याच्या शो दरम्यान त्याने एका फॅनचा फोन फेकून देत गैरवर्तन केलं होतं. या घटनेटचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आता आदित्येन या सगळ्या प्रकारावर मौन सोडले आहे. नेमकं काय म्हणाला तो बघूया.
[read_also content=”एआयनं माणसांचीही घेतली जागा? चिनी मुलींची पंसती AI बॉयफ्रेंडना! काय आहे नेमका प्रकार https://www.navarashtra.com/world/ai-is-replacing-humans-chinese-women-using-glow-for-ai-boyfriends-nrps-506979.html”]
त्याच्या या कृतीवर प्रतिक्रिया देताना आदित्य नारायण म्हणाला, “प्रामाणिकपणे, मला कोणतीही टिप्पणी करायची नाही. मी फक्त वरील देवाला उत्तरदायी आहे. मला एवढंच सांगायचे आहे.” आदित्यची ही प्रतिक्रिया लोकांना आवडली नाही आहे. लोकं पुन्हा त्याला ट्रोल करत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘एवढा अहंकार कुठून येतो भाऊ?’ आणखी एका यूजरने लिहिले की, ‘त्याला स्टारडमचे भूतही म्हणू शकत नाही कारण तो स्वत: इतका लोकप्रिय नाही.’ आणखी एका यूजरने लिहिले, ‘चोर तो चोर वर शिरजोर’. उदितजींनी आपल्या मुलाला काहीही शिकवलं की नाही.
या घटनेवरून आदित्याला ट्रोल करण्यात आल्यानंतर आदित्य नारायणच्या इव्हेंट मॅनेजरने त्याचा बचाव केला होता आणि सांगितले होते की, ती व्यक्ती कॉलेजचीही नव्हती आणि आदित्यने त्याच्यासोबत अनेक सेल्फीही काढल्या होत्या, पण तरीही तो वेळोवेळी गायकाला त्रास देत होता. दर्शन रावलनेही अशा घटनांमुळे महाविद्यालयांमध्ये शो करणे बंद केलं आहे, असेही तो म्हणाला.