आनंद दिघेंनंतर दिग्दर्शक प्रवीण तरडे कोणत्या राजकारण्यावर काढणार चित्रपट, उत्सुकता शिगेला
दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे चित्रपटाच्या खासियतेमुळे चर्चेत राहणारा प्रसिद्ध कलाकार. ‘मुळशी पॅटर्न’, ‘देऊळ बंद’ आणि ‘धर्मवीर’ या चित्रपटामुळे अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे प्रकाशझोतात राहिला. सध्या प्रवीण तरडे ‘धर्मवीर २’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. सध्या स्वत: प्रवीण तरडे प्रमोशनमध्ये व्यग्र असून त्यांनी प्रमोशन दरम्यान आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघेंनंतर कोणत्या महाराष्ट्रातील राजकीय नेत्यावर चित्रपट बनवायला आवडेल ? या प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलं आहे.
हे देखील वाचा – अमिताभ यांचे भावासोबत कसे आहे नाते ? बिग बींनी पहिल्यांदाच सांगितला किस्सा
स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघेंनंतर महाराष्ट्रातील आणखी एका राजकीय नेत्याच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवायची त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. ते नेते दुसरे तिसरे कोणीही नसून देशातल्या राजकारणातले चाणाक्ष शरद पवार आहे. शरद पवार “राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटा”चे प्रमुख आहेत. त्यांच्या जीवनावर आधारित सिनेमा बनवण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले आहे.. ‘धर्मवीर’नंतर कोणत्या राजकीय नेत्यावर चित्रपट करावासा वाटतो ? या प्रश्नाचं उत्तर देताना दिग्दर्शक तरडेंनी सांगितले की, “प्रत्येक राजकारण्याची खासियत वेगवेगळी आहे. मला आनंद दिघेंनंतर शरद पवार यांच्यावर चित्रपट बनवायला आवडेल.”
हे देखील वाचा – निर्माते शेखर कपूर ‘मासूम… द नेक्स्ट जनरेशन’ चित्रपटाबाबत झाले भावुक सांगितली कथा!
“नेते शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नेते राज ठाकरे, उद्धव ठाकरे या प्रत्येक नेत्याची आपल्याला वेगवेगळी खासियत पाहायला मिळेल. महाराष्ट्रातील प्रत्येक नेत्यामध्ये राजकारणाच्या पलिकडे जाऊन एक गुण आपण स्वीकारायला हवा. आपण अनेकदा, नेत्यांना पक्षाच्या चष्म्यातून किंवा राजकीय चष्म्यातून बघत असतो. त्यामुळे त्यांच्यातील गुणांकडे आपण दुर्लक्ष करतो. मला शरद पवारांवर चित्रपट बनवायला फार आवडेल. कारण की, आम्ही त्यांना बांधावरचा नेता म्हणूनच ओळखतो.”
“शरद पवार साहेब गाडीतून चालले असताना बांध्यावरच्या साध्या माणसालाही ते हाक मारतात. सामान्य कुटुंबातील नेता म्हणून आज त्यांची ओळख आहे. असं असलं तरीही त्यांचं आयुष्य सिनेमॅटिक आहे. बारामतीहून ते दौंडला भाज्या विकायला जायचे. आता त्यांचा हा प्रवास माझ्या वाट्याला येतो की नाही हे माहित नाही. आणि मला आणखी एका नेत्याचा सिनेमा बनवायला आवडेल ते म्हणजे पतंगराव कदम”