"अभिषेक आणि ऐश्वर्या स्वभावाने परस्पर विरोधी..." 'कुछ ना कहो'फेम अभिनेत्री जरा स्पष्टच बोलली
गेल्या काही दिवसांपासून अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या बातम्यांची जोरदार चर्चा सुरु आहे. पण नुकताच अभिषेक आणि ऐश्वर्याच्या एका फोटोमुळे दोघांच्याही घटस्फोटाबद्दलच्या चर्चा बंद झाल्या आहेत. व्हायरल फोटोमध्ये दोघेही एकत्र दिसत होते. फोटोत अभिषेक आणि ऐश्वर्या खूपच आनंदित दिसत होते. हा लेटेस्ट फोटो निर्माती अनु रंजन हिने सोशल मीडियावर शेअर केला होता. पण अशातच ‘कुछ ना कहो’मधील प्रसिद्ध अभिनेत्रीने दोघांच्याही स्वभावावर भाष्य केलं असून तिने एक महत्वाचा खुलासा केला आहे.
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृतदेह बाथटबमध्ये आढळला, मृत्यूचं गुढ कायम
अभिनेत्री तनाज ईरानी हिने अभिषेक आणि ऐश्वर्याबद्दल खुलासा केला आहे. ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन आणि तनाज ईरानीने ‘कुछ ना कहो’ चित्रपटात एकत्र काम केलं आहे. काही मोजक्याच चित्रपटात अभिषेक आणि ऐश्वर्याने काम केले असून त्यातील हा एक चित्रपट आहे. मुलाखतीत अभिनेत्री तनाज ईरानी हिने ‘कुछ ना कहो’ चित्रपटादरम्यानच्या आठवणी आणि ऐश्वर्या-अभिषेकचे स्वभाव कसे होते, याबद्दल भाष्य केले आहे.
मुलाखतीत तनाजी ईरानीने सांगितलं की, “अभिषेक नेहमीच सेटवर खूप गंमतीशीर आणि खोडकर राहायचा. एक दिवशी, मी सेटवर येईपर्यंत तो सर्वांसोबत सतत मस्ती आणि वेगवेगळे प्रँक करायचा. नंतर मी आले आणि आम्ही सर्वांनी मिळून एका सीनच्या शूटिंगवेळी त्याच्याबरोबर प्रँक करायचं ठरवलं. त्यानंतर अभिषेक आणि माझ्यात चांगली मैत्री झाली. अभिषेक ही फार चांगली व्यक्ती आहे.”
‘आई तुळजाभवानी’ मालिकेत सुरभी हांडेची एन्ट्री! साकारणार म्हाळसाची भूमिका
अभिनेत्रीने मुलाखतीत दोघांच्याही स्वभावाबद्दल सांगितले, “शूटिंगच्या वेळी सेटवर अभिषेक नेहमीच मस्तीच्या मूडमध्ये राहायचा. तो कायमच कोणासोबत तरी का होईना काहीही करामती करायचा. तर, ऐश्वर्या कायम शांत असायची. ती कायमच स्वत:च्या कामामध्ये गुंतून राहायची, आपल्या कामातच लक्ष देत राहायची. ऐश्वर्या आणि अभिषेक स्वभावाने परस्पर विरोधी आहेत.”
नंतर तनाज ईरानीने ऐश्वर्या रायसोबतचा काम करण्याचा अनुभवही शेअर केला. “मी ऐश्वर्यासोबत दोन चित्रपटांत काम केले आहे. ऐश्वर्या कायम तिच्या कामावर लक्ष केंद्रित करते. ती अत्यंत हुशार आणि खूप सुंदर मुलगी आहे. ऐश्वर्या दिसायला सुद्धा फार सुंदर आहे. ती अगदी एका बाहुलीसारखी आहे असं मला वाटतं. तिच्यासोबत वेळ घालवल्यानंतर मी नेहमीच आरशात बघायचे.”