ऐश्वर्या आणि अभिषेकने लावली मुलगी आराध्याच्या परफॉर्मन्ससाठी एकत्र हजेरी
वैवाहिक जीवनाभोवती मीडियाच्या वाढत्या अटकळींदरम्यान, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन हे मुंबईतील धीरूभाई अंबानी शाळेच्या वार्षिक दिनाच्या कार्यक्रमात एकत्र दिसले. गेल्या अनेक महिन्यांपासून ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या आणि दोघांनीही कधीही फोटोदेखील शेअर केले नव्हते. त्यामुळे यावर शिक्कामोर्तबच झाल्याप्रमाणे चर्चा रंगल्या होत्या.
मात्र आता दोघांनीही सर्वांची तोंडं बंद केली आहे. मुलगी आराध्याच्या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनादरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेक हातात हात घेत एकत्र आले आणि इतकंच नाही तर अभिषेक ऐश्वर्याची काळजी घेतानाही दिसला. यावेळी अभिषेकचे वडील, दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांनीदेखील नातीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती (फोटो सौजन्य – Instagram)
अखेर चर्चांना पूर्णविराम
प्रतिष्ठित कार्यक्रमात बच्चन कुटुंबाच्या सार्वजनिक उपस्थितीने प्रसारमाध्यमांना भुरळ घातल्याचे दिसून आले. विशेषत: सध्या सुरू असलेल्या घटस्फोटाच्या अफवा लक्षात घेता, ऐश्वर्या आणि अभिषेकचे सोहळ्याला एकत्रित उपस्थिती लावणे सर्वच चाहत्यांना दिलासादायक ठरले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून उठलेल्या वावड्या या जोडप्याने आपल्या एकत्रित उपस्थितीने शमवल्या असल्याचे दिसून आले आहे.
कोण म्हणतं अभिषेक- ऐश्वर्याचा घटस्फोट होणार?; हा घ्या पुरावा, पाहा Photo
ऐश्वर्या – अभिषेकचा व्हायरल व्हिडिओ
ऐश्वर्याने लावले नव्हते बच्चन आडनाव
काही दिवसांपूर्वीच दुबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात ऐश्वर्याने आपले नाव केवळ ऐश्वर्या राय लावल्याने या अफवांना जास्त हवा मिळाली होती. मात्र आता या सगळ्यात काहीच तथ्य नसल्याचे समोर आले आहे. यावेळी ऐश्वर्याने कोणतेही वक्तव्य केले नाही तर न बोलता आपल्या मुलीच्या कार्यक्रमासाठी या दोघांनी उपस्थिती दर्शवली आणि इतकंच नाही तर दोघांनीही हातात हात घेत आणि सर्वांशी मनमिळावूपणे बोलत आपण अजूनही एकत्रच आहोत हे दाखवून दिले.
ऐश्वर्याचे सौंदर्य आणि कॅज्युल अभिषेक
मोहक काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेली ऐश्वर्या संपूर्ण कार्यक्रमात शांतता आणि संयम दाखवताना दिसली आणि तिचा हा लुक अत्यंत क्लासी आणि रॉयल होता. तिने नेहमीप्रमाणे ग्लॉसी मेकअप करत आपले सौंदर्य जपले. भारतीय पोषाख आणि त्यावर लालभडक लिपस्टिक लावत तिने आपला लुक पूर्ण केला होता. तर अभिषेक आणि अमिताभ यांनी पाहुण्यांशी संवाद साधला. अभिषेक यावेळी अत्यंत कॅज्युल लुकमध्ये दिसून आला. हुडीमध्ये असणारा अभिषेक ऐश्वर्या आणि मुलगी आराध्याची काळजी घेतानाही दिसला.
“अभिषेक आणि ऐश्वर्या स्वभावाने परस्पर विरोधी…” ‘कुछ ना कहो’फेम अभिनेत्री जरा स्पष्टच बोलली
कधीच वक्तव्य नाही
गेले काही महिने अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या वावड्या उठल्यानंतरही कधीही त्या दोघांनी याकडे लक्ष दिलेले नाही अथवा कोणतेही व्यक्तव्य केलेले नाही. ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी नेहमीच अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि आता या अफवा खोट्याच आहेत हे दाखवून दिले आहे. दोघांनीही आपण एकत्र असल्याचे स्पष्ट केले आहे.