‘मिर्झापूर 3’ या (Mirzapur Season 3) वेबसिरीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. कालिन भैया (पंकज त्रिपाठी) असो की शरद (अंजूम शर्मा) या सर्वांशी प्रेक्षक थेट जोडलेले असतात. दोन अप्रतिम सीझननंतर ही मालिका आता तिसऱ्या सीझनसह परतणार आहे. मंगळवारी मुंबईत झालेल्या खासगी व्हिडिओ कार्यक्रमात मिर्झापूरची स्टार कास्ट दिसली आणि ‘मिर्झापूर 3 साठी सगळे खुप उत्साही दिसले. या वेळी अली फजलने या सीझनच्या गुणवत्तेचा उल्लेख करत असल्याचे सांगितले.
श्वेता त्रिपाठी, पंकज त्रिपाठी, अली फजल, रसिका दुग्गल आणि विजय वर्मा यांच्यासह ‘मिर्झापूर’चे सर्व स्टार्स एकत्र आले. या मालिकेबद्दल अभिनेता अली फजल म्हणाला, ‘अखेर आम्ही परतलो आहोत आणि मालिकेच्या तिसऱ्या सीझनमध्ये प्रेक्षकांसाठी आणखी मसाला आहे. पहिल्या दोन सीझनप्रमाणे तिसरा सीझनही मजेशीर असेल, असेही तो म्हणाला.
अली फजल पुढे म्हणाला, ‘मालिकेत काही नवीन पात्रांची ओळख होईल, तर काही जुन्या पात्रांनाही निरोप दिला जाईल. ‘मिर्झापूर’ मालिका ही मिर्झापूरचा राजा कालिन भैय्या आणि पंडित बंधू गुड्डू आणि बबलू यांची कथा असल्याची माहिती आहे. दोघांमध्ये वर्चस्वासाठी लढा सुरू आहे. त्यात राजकारण आणि उद्योगधंद्याची चव आहे.
प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर मंगळवारी मिर्झापूर ३ चा फर्स्ट लूक शेअर करण्यात आला. पोस्टरमध्ये सिंहासनासारखी खुर्ची पेटलेली आहे. सोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘सिंहासनावर आपला दावा मांडत गुड्डू आणि गोलू एका नव्या स्पर्धकाविरुद्ध उभे आहेत. ते आगीतून चालतील की सत्तेची खुर्ची कायमची संपवण्याचा प्रयत्न करतील.