रामचरणने राहासाठी पाठवलेलं गिफ्ट पाहून आलिया घाबरली, अभिनेत्रीने सांगितला खास किस्सा
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या ‘जिगरा’सिनेमामुळे कमालीची चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी म्हणावा तसा प्रतिसाद दिलेला नाही. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजेच ११ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेला आहे. आलिया भट आणि वेदांग रैना स्टारर ‘जिगरा’सिनेमाने दोन दिवसांत देशभरात ११.०५ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. अशातच सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने आलियाने एक खास किस्सा सांगितला आहे. टॉलिवूड इंडस्ट्रीतल्या सुप्रसिद्ध अभिनेत्याने आलियाची लेक राहाच्या नावावर एक हत्ती दत्तक घेतला आणि तो आलियाला गिफ्ट केला. अभिनेत्रीने हा किस्सा एका मुलाखतीत सांगितला आहे.
हे देखील वाचा – बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर रितेश देशमुखची पोस्ट, केली न्यायाची मागणी; म्हणाला…
आलियाची लेक राहाला तिच्या नावाने हत्ती गिफ्ट देणारा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून हा अभिनेता म्हणजे RRR फेम रामचरण आहे. २०२२ मध्ये रिलीज झालेल्या RRR चित्रपटात रामचरण, ज्यु. एनटीआर आणि आलिया प्रमुख भूमिकेत होते. रामचरणबद्दलचा किस्सा आलियाने एका मुलाखतीत सविस्तर किस्सा सांगितला आहे. ती म्हणाली, “राहाच्या जन्मानंतर एका महिन्यानंतर मी आमच्या बिल्डिंगीच्या खाली फिरत होते. त्यावेळी एक व्यक्ती माझ्याकडे आला आणि मला म्हणतो की, मॅम रामचरण यांनी राहासाठी हत्ती पाठवला आहे. मी हे ऐकून काही काळासाठी थक्कच झाले. कधीही आणि केव्हाही काहीही होऊ शकतं.”
हत्तीचे नाव ऐकताच आलिया मोठा हत्ती असल्याचा विचार करून घाबरली होती. आलियाने पुढे मुलाखतीत सांगितले की, “जेव्हा मी हत्तीला पाहायला तेव्हा तो खरा नाही तर खोटा हत्ती होता. राम चरणने राहासाठी खेळण्यातला गिफ्ट म्हणून एक लाकडी हत्ती पाठवला होता. आम्ही त्या हत्तीचं नाव एली असं ठेवलं आहे. ज्याच्यासोबत राहा दररोज खेळते. रामचरणने राहासाठी पाठवलेलं गिफ्ट कायमच माझ्या लक्षात राहणार आहे. खरंतर, राम चरणने राहाच्या नावाने एक हत्ती दत्तक घेतला आहे. त्याने त्या हत्तीचं पालनपोषण करण्यासाठी त्याला एका गावाला दिलं आहे. तिथले लोकं त्याची अगदी उत्तमरित्या काळजी घेत आहेत.”
हे देखील वाचा – मुलगी झाली रे! मसाबा गुप्ताच्या घरी झाले दुर्गाचे आगमन
सध्या आलिया ‘जिगरा’सिनेमामुळे कमालीची चर्चेत आहे. आलियाचा ‘जिगरा’ आणि राजकुमार राव- तृप्ती डिमरी स्टारर ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’सिनेमा एकत्रित बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. ‘जिगरा’ आणि ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ या दोन्हींमध्ये सर्वाधिक कमाई ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ची आहे. ‘जिगरा’ने दोन दिवसांत ११.०५ कोटींची कमाई केलेली आहे. तर ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ने दोन दिवसांत १२ कोटींचे कलेक्शन केले आहे. तर साऊथचा सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘वेट्टियाँ’ हा चित्रपटही १० ऑक्टोबरपासून थिएटरमध्ये दाखल होणार आहे. हा चित्रपट जबरदस्त कलेक्शन करत असून शनिवारीच या चित्रपटाने २६.१ कोटींचा व्यवसाय केला.